बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (09:41 IST)

डॉक्टर्स डे : डॉक्टर मित्रांसाठी ही पोचपावती

happy doctors day
महामारी ची विक्राळ स्थिती,
बाहेर पडूच नये, हीच परिस्थिती,
पण "ते"मात्र जातंच होते आत्ताही,
आपल्या शपथे ला जागत होते, तशातही,
कधी ना नुकुर नाही,न कधी चालढकल,
घरदार पणाला लावून,दिला पळ अन पळ!
जीव त्यांचा ही आहेच की अनमोल!
कित्ती जणांनी तर दिले आपल्या प्राणाचे मोल,
आपण ही जाणलं पाहिजे त्यांचे हे बलिदान,
ते नाहीत तर जगणं शक्य नाही,हे सत्य महान,
अश्या ह्या आमच्या डॉक्टर मित्रांसाठी ही पोचपावती,
हसत असतो "तो"सदा आपल्या अवती भवती!
.....अश्विनी थत्ते