गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

तुम्ही आठवड्यात 40 तास काम करता…तर सावधान !

If you work 40 hours a week
तुम्ही आठवड्यात 40 तासांपेक्षा अधिक काम करता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याचा धोका वाढवत आहात..
 
ऑस्ट्रेलियन युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्ती 39 तासांहून अधिक काम करतात त्यांचे मानसिक तसेच शारिरीक आरोग्य बिघडते. 
 
आठवड्यात 39 तासाहून अधिक काम केल्यास खाणे तसेच स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ देता येता नाही, असे एएनयू रिसर्च स्कूलचे हुआंग डिंग म्हणाले. 
 
त्यासोबतच महिलांसाठी कामाचे 34 तासच असले पाहिजेच. याचे कारण म्हणजे महिलांवर घरातील कामांचीही जबाबदारी असते. त्यामुळे 34 तास काम 
 
त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यापुढे कामाचे तास वाढल्यास त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.