शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (12:50 IST)

Army Day आज भारतीय सेना दिवस

भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' साजरा केला जातो. सैन्याप्रती आदरभाव ठेवून हा दिवस देशभरात साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी त्यांच्या पदाचा स्वीकार केला होता. 
 
करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 साली ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर यांच्याकडून भारतीय थल सैन्याच्या कमांडर इन चीफचा पदभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर तब्बल 33 वर्षांनी करियप्पा यांना ‘फिल्ड मार्शल’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले होते. 
 
28 जानेवारी 1899 साली कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करियप्पा यांचा जन्म झाला. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करियप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करियप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला ‘आर्मी दिन ‘ साजरा केला जातो.