मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (15:57 IST)

जागतिक परिचारिका दिवस!

रुग्णांची सेवा, कित्ती कार्य महान,
परिचरिकेची हीच ओळख,कर्तृत्ववान!
अविरत सेवेची ही ग्वाही देते,
आई परी रुग्णाची ती काळजी घेते,
एक दुवा असें ती जणू देवाघरचा,
ममते नी भरलेला असतो चेहेरा तिचा,
ना कधी किळस, ना घृणा कधी पहिली,
सेवा केल्यानं तिच्या, रुग्ण बरी झाली,
त्यांच्या पाठीवर ही थाप द्यावी शाबासकीची,
सदैव कौतुकाची राहील कामगिरी तिची!
...अश्विनी थत्ते