लाख लाख उपकार, ठरले वरदान विज्ञान,
केले चमत्कार विविध, वाढले ज्ञान,
कक्षा रुंदावल्या, सखोलता कित्ती वाढली,
साहाय्याने विज्ञानाच्या मानवाची प्रगती जाहली,
सावट अज्ञाना चे दूर दूर पळाले,
कास धरता त्याची, कितीतरी क्षेत्रे काबीज झाले,
देशविदेशात मानसन्मान देशास मिळाला,
उद्योग नवे नवे स्थापून, माणूस आत्मनिर्भर झाला,
रोजगार वाढीस लागला, मिळे काम हातास,
नवनवीन अभ्यासक्रमाने,गवसे नवी दिशा देशास,
राहणीमान उंचावले विज्ञाना च्या मदतीने ,
स्वर्ण पंख मिळाले विज्ञाना च्या रूपाने!
उगवू लागला शेतकरी सोनं त्याच्या शेतात,
नवीन तंत्रज्ञान त्यासाठी ते वापरतात,
किती गावी थोरवी, कसं करावं गुणगान,
आहे तो सोबतीला, मिळे मान सन्मान!
...अश्विनी थत्ते