बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (12:49 IST)

श्रुश्रूषा हा असें भला दैवी गुण...

श्रुश्रूषा हा असें भला दैवी गुण,
त्यात आमच्या परिचारिका निपुण,
आईच जणू सेवेत असते, रुपात तिच्या,
ममतेने करणार सेवा, अपेक्षा आमच्या,
सध्या च्या काळात तर कित्ती भार तिच्यावर,
आपलं घरटं सोडून,ती आपली कामावर,
नसती ती तर हा काळ कसा असता भयंकर,
तक्रार कधी नसते तिची तरीही कधी ह्यावर,
आपलं कर्तव्य असें, तिची करावी कदर,
कर्तव्यातून सतत च तिची मायेची फुंकर,
न विसरू कधी तिचे योगदान आम्ही सारे,
देवीच्या ह्या रूपाचा ठेवू आदर वंदून तिला रे!
.....अश्विनी थत्ते