शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 7 मार्च 2020 (15:08 IST)

समता: हिंदूंची आणि पाश्चिमात्यांची...

पाश्चिमात्य जग समतेवर चालत आहे. समता म्हणजे equility. पण त्यांची समता monotheism वर आधारित आहे. monotheism म्हणजे एकाच देवाला मानणारे पंथ. जगात एकच देव आहे. त्यानेच या सृष्टीचा निर्माण केला आहे. त्याच्या उपर कुणी नाही. पण monotheism ची मोठी समस्या अशी आहे की नवीन संकल्पना त्यांना मान्य नाही. एकच येशू, एकच अल्लाह...
 
त्यामुळे काळाशी सुसंगत असलेले नवीन विचार ते धर्मात समाविष्ट करू शकले नाही. भारतीय पंथ अथवा हिंदू धर्म आपण म्हणतो, त्या हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथात लॅपटॉप किंवा मोबाईल समाविष्ट केला तरी आपला धर्म बुडणार नाही. याच कारण हिंदू धर्म हा polytheistic आहे. polytheistic म्हणजे एकापेक्षा अनेक देवांची उपासना करणारे. त्यामुळे कोणताही विचार आपल्याला अस्पृश्य नाही. अगदी नास्तिकवाद जगाला आपण शिकवला. आज भारतीय नास्तिक माणूस हिंदूच असतो. पण पाश्चात्य नास्तिक माणूस ख्रिस्ती नसतो. तो केवळ नास्तिक असतो. He is only atheist. But in India he is hindu atheist. हा मोठा फरक आहे. आज आपल्याकडचे नास्तिक चार्वाकच्या पावलावर पाऊल देत चालत नसून मार्क्स वगैरेच्या मार्गावर चालतायत, म्हणून ते तर्कट वाटतात. असो. 
 
पाश्चिमात्य जग monotheistic असल्यामुळे तिकडच्या नास्तिकानाही नवीन विचार स्वीकारावेसे वाटत नाहीत. आपल्यापेक्षा शहाणा कुणी नाही ही monotheistic असण्याची मोठी समस्या आहे. आमचाच देव श्रेष्ठ अशाच थाटात आम्ही नास्तिकच श्रेष्ठ. म्हणजे तिकडचे नास्तिक किंवा धार्मिक दोघेही monotheistic आहेत. म्हणून त्यांची समता केव्हा आकार घेते जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे होता. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासारखे होत नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला स्वीकारत नाही. समता आहे, पण अट आहे..  मुस्लिम जगतातही समता आहे. पण अट आहे, तुम्हीही मुस्लिम व्हा. हिंदू धर्मात तशी अट नाही.
 
हिंदू धर्मातील समता म्हणजे तुम्ही डोळे मिटायचे आणि त्या परम शक्तीशी एकरूप व्हायचे... मग तुम्हाला जग मिथ्या भासू लागतं. मिथ्या म्हणजे खोटे नाही. तर मिथ्या म्हणजे जसे आहे तसे नाही. जे डोळयांना दिसते त्यापलीकडे जगाची रचना आहे. अणू, रेणू आहे, स्पंदने आहेत. म्हणजे आपण हाडामांसाचे जरी असलो तरी ते सत्य नाही. आपल्या सर्वांमध्ये एकच काहीतरी आहे... ते काय आहे याचा शोध घेण्याचा अधिकार सर्वांना आहे... इथे प्रत्येक माणूस प्रेषित होऊ शकतो. मलाच कळलंय तेच सत्य हा अट्टाहास नाही. सत्यशोधन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. हा धर्मच सत्यशोधक आहे. इथली समता म्हणजे माझ्यात जे आहे, तेच समोरच्यात आहे, तेच या दगडात आहे, तेच या लॅपटॉपमध्ये आहे, तेच या कुत्र्यात आहे... सगळीकडे आहे... चराचरात देव ही संकल्पना याच समतेच्या भावनेतून आली... थोडक्यात पाश्चिमात्य समता तेव्हाच ग्राह्य मानली जाते जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे होता, तुम्ही त्यांच्यासारखे नसता तेव्हा तुम्ही जणू काफर असता. पण हिंदू समता म्हणजे तुम्ही जिवंत माणूस नसून शिळा जरी असाल तरी तुम्ही पूजनीय आहात... 
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री