रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 1 जून 2018 (13:42 IST)

मालाड मध्ये मोफत मार्शल आर्टस् मार्गदर्शन शिबीर

गोरेगाव-मालाड आणि कांदिवली विभागातील मुलामुलींना शारीरिक-मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी शोतोकान कराटे डू फेडरेशन संस्थेच्या वतीने एकदिवसीय मोफत मार्शल आर्टस् मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे. रविवार, दि. ३ जून रोजी संध्याकाळी ४ ते ८ ह्या वेळेत शगुन हॉल, मलकानी इस्टेट, बाणडोंगरी, दत्तमंदिर रोड आणि हायवे जंक्शन, मालाड (पूर्व) ह्या ठिकाणी सेन्सई गोपाळ शेट्टीगर, राजू गुप्ता, निखिल यादव आदी प्रशिक्षकांचे मागदर्शन आणि प्रात्यक्षिक ह्यावेळी सादर होईल.
 
संस्थेच्या वतीने स्व-रक्षण, किक बॉक्सिंग, सशस्त्र प्रशिक्षण, स्ट्रेचिंग व्यायाम, जिम्नॅस्टिक, स्कीपिंग, योगा एकाग्रता, वेटलॉस व्यायाम आदी प्रकार लवकरच शिकविले जाणार आहे. निरोगी आरोग्य, वजन कमी करणे, शरीराची लवचिकता व क्षमता वाढविणे, कलाकर्तब शिकणे, मानसिक बळ वाढविणे अश्या विविध फायदेशीर गोष्टी शिकण्याची संधी येथे उपलब्ध होणार आहे. विभागातील मुलामुलींनी तसेच तरुणतरुणींनी सहभागी होण्यासाठी ९०७६८९२२६० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.