बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

संगीत व नवी भाषा शिकल्याने जास्त प्रभावी होतो मेंदू

एखादी नवी भाषा बोलण्यास शिकणे आणि वाद्य वाजविण्याचे कौशल्य प्राप्त केल्यामुळे आपला मेंदू जास्त प्रभावीपणे काम  करण्यास सक्षम होऊ शकतो, असे एका ताज्या अध्ययनात आढळून आले आहे. म्हणूनच संगीतकार आणि दुभाषी लोकांमध्ये काम करण्याची आठवण अधिक चांगली असते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. न्यूयॉर्क केडी ऑफ सायन्सेसमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार, संगीत वा एकापेक्षा जास्त भाषांची जाण असलेले लोक मेंदूच्या विविध नेटवर्कमध्ये सक्रिय असतात आणि त्यांच्या मेंदूच्या हालचाली कमी असतात. कॅनडातील बेक्रेस्टस रॉटमॅन रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ क्लाउडे लन यांनी सांगितले की, समान काम करण्यासाठी संगीतकार आणि दुभाषी लोकांना कमी प्रयत्न करावे लागतात, असे या अध्ययनात दिसून आले. ते ज्ञानासंबंधीच्या घसरणीतही त्यांचा बचाव करते आणि स्मृतीभ्रंशाचा धोकाही टाळते. एखादे वाद्य वा नवीन भाषा शिकणार्‍या व्यक्तीचा अनुभव त्याचा मेंदू कशाप्रकारे काम करतो आणि मेंदूच्या कोणत्या नेटवर्कचा वापर करतो, हे ठरवू शकते, असे या अध्ययनाच्या निष्कर्षांमध्ये आढळून आले.