शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदूरच्या स्थापना दिवस निमित्त...

चैत्र गुढी पाडवा हा मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदूरचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिन 24 मार्च 2018 शनिवारी तांबे सभागृह महाराष्ट्र साहित्य सभा भवनामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात वायलीनं वादिका सुश्री अक्षता विंचूरकरने राग रागेश्री पासून सुरू करून आपल्या वायिलनवर विभिन्न शास्त्री रागांचे वंदन करून कार्यक्रमाला सुरमय बनवले. 
तसेच स्रोत गायन संस्था 'स्वरा मंडळातर्फे मेघना निरखीवाले यांचे संयोजन व संहिता निर्देशनामध्ये गणपती वंदना : प्रात: 'स्मरामि गणनाथ....' 
श्री सरस्वती स्त्रोत : 'याकुंदे तुषार हार धवला... 
सूर्याष्टकम् आदि देव नमस्तुभ्यम् ...'चैत्र नवरात्र असेल आणि श्रीरामाची स्तुती नाही असे कसे शक्य आहे आणि श्रीराम रक्षा स्त्रोतम् : 'शिरो में राघव: पातु....' 
महालक्ष्मी अष्टकम् : 'नमोस्तेस्तु महामाये....' दशाअवतार स्त्रोतम् : 'प्रलय पयोधिजले धृतवानसि वेदम्... या प्रकारे एक दोन वेद शास्त्र आणि पुराणात उल्लेखित सुरेल रचना ऐकवून सर्व रसिकांना भावविभोर केले. निवेदक रेणुका तारे यांचे होते, गायन कलाकार राजश्री देव, सुचित्रा खुटाल, मृदुला ग्वाल्हेकर, वैशाली द्रोणकर व रश्मी निगोसकर असे होते. अकादमीच्या या संपूर्ण शानदार व गरिमामय कार्यक्रमाचे सूत्रधार कीर्तिश धामारीकर होते. 
कार्यक्रमाचे संचलन अलकनंदा साने यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष श्री मधुरकर निरखीवाले, अपाध्यक्ष अरविंद जवळेकर, कोशाध्यक्ष अनिल दामले यांनी केले. आभार प्रदर्शन कीर्तिश धामारीकर यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत मराठी समाजाचे व शहरातील गुणी सुधी श्रोता उपस्थित होते.  
 
कार्यक्रमाचा शेवट सुमधुर चविष्ट श्रीखंडाचा आस्वाद घेऊन करण्यात आला.