बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

महात्मा गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवले – तुषार गांधी

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मोठ्या वादाला पुन्हा वाचा फोडली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्या झाली या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवण्यात आले आहे असे मोठे खळबळजनक वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मगाव असलेल्या नाशिकमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.परशुराम सायखेडकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत 'महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओ का सनातन सत्य' या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
 
बापूंच्या हत्या करताना ज्या प्रकारे सर्व घटना क्रम होता तसाच सर्व प्रकार आणि त्याच पद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या केली आहे. असे गांधी यांनी सांगितले आणि ते पुढे म्हणाले की नथुराम गोडसे बुरखा घालून बापूंना गोळ्या झाडणार होता, मात्र दोन वेळा बुरखा घातला असल्याने त्याला नीट चालता देखील आले नाही सोबतच बंदूक ठेवायला त्याच्या कडे  खिसाही देखील नव्हता असे तुषार गांधींनी यावेळी दावा केला आहे.
 
तुषार गांधी पुढे म्हणाले की, तुम्हाला दाभोळकर बनायचं आहे का? तुम्ही  मॉर्निंग वॉकला जाता का? अशा धमक्या अनेकांना मिळत आहेत, अनेकदा तर मलाही धमकी वजा विचाले की तुम्ही मॉर्निंग वॉकला जातात का? असं तुषार गांधींनी अयावेळी  सांगितले आहे.
 
सुप्रीम कोर्टात याचीक : गांधी हत्या तपास योग्य पद्धतीने व्हावा
 
महात्मा गांधींच्या हत्येचा अयोग्य पद्धतीने झाला आहे, तो नीट झाला नाही. त्यामुळे त्याचा तपास पुन्हा व्हावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे ही माहिती तुषार गांधी यांनी यावेळी दिली आहे.