गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (12:42 IST)

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर आकार असलेले हे लघुग्रह एकच असावेत, असे आधी संशोधकांना वाटले होते. मात्र, आता जगातील सर्वात मोठ्या अशा तीन रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने याबाबतचे निरीक्षण करण्यात आले आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मोरोक्को ऑकेमेडेन स्काय सर्व्हेकडून याबाबतचे निरीक्षण करून त्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी हा एकच लघुग्रह असावा, असे वाटले होते व या लघुग्रहाला '2017 वायई 5' असे नाव देण्यात आले. जूनपर्यंत या लघुग्रहाबाबत अधिक माहिती मिळालेली नव्हती. मात्र, आता एकसारख्या आकाराच्या दोन खगोलांचा हा लघुग्रह असल्याचे ताज्या संशोधनातून पुढे आले आहे. त्यांच तुलनेने सुस्पष्ट अशा प्रतिमाही टिपण्यात आल्या आहेत. गेल्या 21 जूनला या दोन्ही खगोलांनी मिळून बनलेला हा लघुग्रह पृथ्वीच्या आतापर्यंतच्या काळातील सर्वात कमी अंतरापर्यंत आला होता. आता आगामी किमान 170 वर्षे तो इतका जवळ येण्याची शक्यता नाही. जूनमध्ये तो पृथ्वीपासून 60 लाख किलोमीटरच्या अंतरावर होता.