रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Updated : शनिवार, 22 मे 2021 (13:46 IST)

Gautama Buddha प्रेरक कथा : अमृताची शेती

एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एका शेतकऱ्याकडे गेले. तथागत स्वतः भिक्षा मागण्यास आलेले असताना बघून तो  त्यांना हिणवून म्हणाला, शेतात मी नांगरतो आणि मग खातो. आपल्याला देखील शेतात नांगरलेले पाहिजे आणि बियाणे पेरून मग खालले पाहिजे.  
बुद्ध म्हणाले- महाराज !मी देखील शेतीच करतो. यावर त्या शेतकऱ्याला उत्सुकता वाटली आणि तो म्हणाला की -मी तर आपल्याकडे कधीही नांगर,बैल आणि शेत बघितले नाही.आपण या संदर्भात आपले स्पष्टीकरण द्यावे.   
बुद्ध म्हणाले -महाराज ! माझ्या कडे श्रद्धेचे बियाणे, तपश्चर्या रुपी पाऊस,प्रजा स्वरूपात नांगर आहे. पापभयाचे दंड आहे. विचारांची दोरी आहे, स्मृती आणि जागरूकता स्वरूपी नांगराची पैनी आहे. 
मी वचन आणि कर्मानें राहतो .मी आपल्या या शेतीला वाया गेलेल्या गवता पासून मुक्त ठेवतो. आनंद रुपी पेरणीची कापणी होई पर्यंत प्रयत्नशील राहतो. अप्रामाद माझे बैल आहे जे कोणतेही अडथळे बघून देखील मागे हटत नाही ते मला माझ्या शांतिस्थळी घेऊन जातात. अशा प्रकारे मी अमृताची शेती करतो.