Dharma Sangrah

World Care Day 2025 जागतिक काळजी दिन इतिहास, महत्व

Updated: शनिवार, 7 जून 2025 (11:26 IST)
जागतिक काळजी दिनाचा इतिहास
जागतिक काळजी दिनाची सुरवात ७ जून १९९७ रोजी ब्रिघिड नावाच्या बाळाच्या नऊ दिवसांच्या आयुष्यापासून सुरू झाली. अकाली जन्म झाल्यानंतर, सॉफ्टवेअर अभियंता सोना मेहरिंग यांनी पहिली केअरिंगब्रिज वेबसाइट तयार केली. सोनामुळे, मित्र आणि कुटुंबियांना बाळ ब्रिघिडच्या आरोग्याबद्दल ऑनलाइन अपडेट्स मिळू शकले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेबसाइटने ब्रिघिड आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक गोष्टी आणि आराम दिला. त्यावेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अस्तित्वात नसल्याने, वेबसाइट तयार करण्याची कल्पना क्रांतिकारी होती.

तसेच या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे काळजी घेणे आणि करुणा बाळगणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देणे होय. हा असा दिवस आहे जेव्हा लोक एकमेकांबद्दल अधिक संवेदनशील आणि आधार देऊ शकतात. तसेच जागतिक काळजी दिन साजरा करण्याचे अनेक मार्ग आहे. जसे की, इतरांची काळजी घेणे. आपण आपल्यासोबत इतरांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे असते.  

तसेच तुम्ही स्वतःसोबत तुमच्या कुटुंबाची, मित्रांची आणि नातेवाईकांची, शेजाऱ्यार्यांची, प्राण्याची, पक्ष्यांची देखील काळजी घ्यावी. यामधून आत्मिक समाधान नक्कीच मिळते. तसेच एखाद्यासाठी वेळ काढा, त्यांना मदत करा किंवा त्यांच्याशी बोला. निसर्गाबद्दल सहानुभूती दाखवा. तसेच इतरांशी दयाळू आणि आधार देणारे व्हा. इतरांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना पाठिंबा द्या.

तसेच प्रत्येकाने आपली शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्या. निरोगी जीवनशैली पाळावी, पुरेशी झोप घेऊन आणि नियमितपणे व्यायाम करा. जागतिक काळजी दिन हा असा दिवस आहे जेव्हा आपण एकमेकांबद्दल अधिक काळजी आणि करुणा दाखवू शकतो. हा असा दिवस आहे जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना आधार देऊ शकतो आणि त्यांना बरे वाटू शकतो.

तसेच जागतिक काळजी दिनाचे महत्त्व इतरांना शिक्षित करा. या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर देखील करू शकतात.
ALSO READ: कोलन कर्करोग म्हणजे काय,सुरुवातीला ते कसे ओळखावे
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments