1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (16:03 IST)

हे धरणी माते, आभार मानू कसें ग तुझे

World Earth day
हे धरणी माते, आभार मानू कसें ग तुझे,
वर्षोनुवर्षे तू वाहते अंगावर, साऱ्यांचे ओझे,
अन्न धान्य देऊन आमची क्षुधा भागविशी,
वृक्ष वेली पसरवुनी, समतोल रखीशी,
गोड पाणी देऊन सकला, संजीवन मिळते,
वसुंधरा तुझं नाव तू सर्थकी करते,
तुझ्या कुशीत ग माते, सर्वां विसावा मिळतो,
तुझ्या मातीत पाय रोऊनी, माणूस उभा राहतो,
मिळतो आत्मविश्वास मानवा तुझ्याच पासूनी,
रक्षण्या तुझीच गरिमा, उभा ताठ मानेनी!!
....अश्विनी थत्ते