बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By

विलक्षण श्रीमंत मराठी भाषा

रस्ता - मार्ग
* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.
 
खरं - सत्य
* बोलणं खरं असतं.
* सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो.
 
घसरडं - निसरडं
* पडून झालं की घसरडं.
* सावरता येतं ते निसरडं.
 
अंधार - काळोख
* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
* निसर्गात जाणवतो तो काळोख.
 
पडणं - धडपडणं
* पडणं हे अनिवार्य.
* धडपडणं हे कदाचित सावरणं.
 
पाहणं - बघणं
* आपण स्वत:हून पाहतो.
* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.
 
पळणं - धावणं
* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.
 
झाडं - वृक्ष
* जे माणसांकडून लावलं जातं ते झाड.
* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.
 
खेळणं - बागडणं
* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
* जे मुक्त असतं ते बागडणं.
 
ढग - मेघ
* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.
* जे नक्की बरसतात ते मेघ.
 
रिकामा - मोकळा
 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा. 
* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.