मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (09:16 IST)

सैन्य भरती रॅली 2020: भारतीय सैन्यात 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी संधी

Military Recruitment Rally 2020
भारतीय सैन्यात 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी joinindianarmy.nic.in वर अर्ज करा. 
 
भारतीय सेना गुजरातमधील विविध जिल्ह्यात भरती मेळाव्याचे आयोजन करत आहे. 8वी, 10 वी, 12 वी उत्तीर्ण तरुण या साठी या संकेत स्थळ www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021 आहे. ही भरती शिपाई (जनरल ड्यूटी), शिपाई टेक्निकल, शिपाई टेक्निकल (एविएशन/एम्युनिशन), शिपाई ट्रेंड्समॅन, शिपाई क्लार्क, स्टोअर कीपर, नर्सिंग असिस्टंट या पदांसाठी होणार आहे. 
 
या भरती मेळाव्याचे आयोजन 1 फेब्रुवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान गुजरात जामनगर, पोरबंदर, राजकोट, भावनगर, जुनागढ, सुंदरनगर, कच्छ, गिर, सोमनाथ आणि बोताड, मोरबी, देवभूमी द्वारका आणि दीव (यूटी) मध्ये केले जाणार आहे. या रॅलीचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर 22 जानेवारी 2021 ते 27 जानेवारी 2021 च्या दरम्यान पाठविले जातील. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर दिलेल्या तारखेनुसारच रॅलीच्या स्थळी पोहोचावे.
 
पद आणि पात्रतेचा तपशील-
शिपाई - जनरल ड्यूटी
वय मर्यादा 
वय वर्ष 17 ½ -21 वर्ष (ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 99 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
शिपाई टेक्निकल
वय मर्यादा-
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण 12 वीत फिजिक्स, केमेस्ट्री, गणित आणि इंग्रजी विषय असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
शिपाई टेक्निकल (एविएशन, एम्यूनिशन एग्जामिनर)
वय मर्यादा- 
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण. 12 वीत फिजिक्स, केमेस्ट्री, गणित आणि इंग्रजी विषय असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
शिपाई नर्सिंग असिस्टंट 
वय मर्यादा- 
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 50 टक्के गुणांसह विज्ञान विषयातून 12 वी उत्तीर्ण. 12 वीत केमेस्ट्री, फिजिक्स, बायो आणि इंग्रजी असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
शिपाई लिपिक/स्टोअर कीपर/टेक्निकल इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट्स 
वय मर्यादा- 
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).
किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही प्रवाहात 12 वी उत्तीर्ण. आणि प्रत्येकी विषयात 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
शिपाई ट्रेंड्समॅन (10 वी उत्तीर्ण)
वय मर्यादा- 
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल ).
10 वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असणे आवश्यक आहे. 
 
शिपाई ट्रेड्समॅन (8 वी उत्तीर्ण) 
वय मर्यादा-
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).
8 वी उत्तीर्ण. आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
निवड- 
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) आणि लेखी परीक्षा.
लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल.
 
भरती मेळाव्यात ही कागदपत्रे आणायला विसरू नये.
-प्रवेश पत्र
-मूळ जात शैक्षणिक प्रमाणपत्र.
-छायाप्रत च्या दोन सेट सह.
- फोटोच्या 20 प्रती. फोटो 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा.
-  डोमिसाइल प्रमाणपत्र.
 
पूर्ण सूचना वाचण्यासाठी येथे 

क्लिक करा.