शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

Government Job Vacancy परीक्षेशिवाय नोकरीची संधी

NHAI Job 2021: सिव्हिल इंजिनीअर्ससाठी केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची नामी संधी आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने डेप्युटी मॅनेजरच्या पदांवर भरती काढली आहे. या सरकारी भरतीसाठी कोणतीच परीक्षा घेतली जाणार नाही. 
 
पदाचे नाव - डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल)
पदांची संख्या - 41
वेतन - 56,100 रुपये मासिक (लेवल-10) नुसार अन्य भत्त्यांसह उत्तम वेतन
 
या प्रकारे करा अर्ज
NHAI भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मे 2021 आहे. यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मची लिंकवर क्लिक करुन अर्ज करू शकता.
 
पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक. 
ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) चा वैध स्कोअर. 
 
वयोमर्यादा 
कमाल वयोमर्यादा 30 वर्षे. 
आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.
 
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 
रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड त्यांचा गेट स्कोअर आणि मुलाखतीच्या आधारे होईल.