मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:24 IST)

Indian Navy Recruitment 2021: 1100 हून अधिक पदांसाठी भरती

भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे. ट्रेड्समन मेट या पदासाठी 1159 जागांवर भरती करण्यात येणार आहे. 
 
इस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि सदर्न नेव्हल कमांड अशा तीन ठिकाणी मिळून एकूण 1159 जागांवर ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज 22 फेब्रुवारी 2021 ते 7 मार्च 2021 पर्यंत करता येईल.
 
पदांची तपशील
एकूण पदांची संख्या  : 1159
इस्टर्न नेव्हल कमांड : 710
वेस्टर्न नेव्हल कमांड  : 324 
सदर्न नेव्हल कमांड  : 125
 
इस्टर्न, वेस्टर्न आणि सदर्न कमांडमध्ये अनुक्रमे 303, 133 आणि 57 पदं अनारक्षित असून, अन्य पदं विविध वर्गांसाठी राखीव आहेत. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल वनच्या आधारे वेतन मिळणार आहे. म्हणजेच त्यांचं मासिक वेतन 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये असेल.
 
पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी पास झालेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. तसंच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणंही आवश्यक आहे. 
 
वयोमर्यादा
उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे.
 
अर्ज शुल्क
या पदांसाठी सर्वसामान्य नागरिक, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातल्या उमेदवारांसाठी 205 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. 
महिला, तसंच माजी सैनिक, पीडब्ल्यूडी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क ठेवण्यात आलेलं नाही.
 
निवड
ऑनलाइन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. 
 
अधिक माहितीसाठी : http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10702_92_2021b.pdf, https://www.joinindiannavy.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता.