मंत्रालयात पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे तरुण व्यावसायिकांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी अनुभवी पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात पदासाठी लागणारी शैक्षणिक योग्यता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील दिला गेला आहे. या भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविले आहेत.
एकूण 112 जागा भरण्यात येणार असून यासाठी www.ncs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीए, बीई, बीटेक, बीएड यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान चार वर्षांचा अनुभव असावा. बॅचलर किंवा पीजीमध्ये किमान 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय किमान 24 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे.
पगार
उमेदवारांना दरमहा 50 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 पर्यंत आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.