बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (11:07 IST)

SBI मध्ये 149 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर भरती, वाचा माहिती

स्टेट बॅक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) च्या पदांवर भरतीसाठी योग्य व इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागिवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार sbi.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. एसबीआय एससीओ च्या 149 जागांवर भरती होणार आहे.
 
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे. उमेदवार योग्यता अटी, निवड प्रक्रिया व पगारासह इतर सूचनांसाठी अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या.
 
पदांची तपशील-
डेटा विश्लेषक 8 
फार्मासिस्ट 67
मुख्य प्राध्यापक अधिकारी 1 
सल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) 4 
उपव्यवस्थापक 10 
व्यवस्थापक 51 
कार्यकारी 1 
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी-डिजिटल बँकिंग) 1 
वरिष्ठ विशेष कार्यकारी 3 
वरिष्ठ कार्यकारी 3 
 
शैक्षिक योग्यता : प्रत्येक पदासाठी योग्यता वेगवेगळी आहे, म्हणून उमेदवारांना सल्ला दिला जात आहे की त्यांनी एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन बघावं.
 
अर्ज शुल्क : 750 रुपये (सामान्य वर्गासाठी), एससी-एसटी व विकलांग उमेदवारांसाठी शुल्क नाही.
 
निवड प्रक्रिया : लिखित परीक्षेत यश मिळालेल्या उमेदवारांचा साक्षात्कार होईल. नंतर निवड यादी तयार केली जाईल.
 
वेबसाइट - sbi.co.in