बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:08 IST)

दूरसंचार क्षेत्राचा विकास, ३० लाख नोकऱ्याची निर्मिती होणार

आगामी  काही वर्षांमध्ये दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. ४ जी तंत्रज्ञानासोबतच डेटाचा वाढता वापर, नव्या कंपन्यांचे आगमन, डिजिटल वॉलेट्स आणि स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता यामुळे या क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. २०१८ पर्यंत या क्षेत्रात ३० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. असोचेम-केपीएमजीच्या संयुक्त अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

४ जी वाढते जाळे, डेटाचा वाढलेला वापर, ५ जीची सुरु असलेली तयारी, एमटूएमचे नवे तंत्रज्ञान, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा विकास यांच्यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या क्षेत्रात २०२१ पर्यंत ८ लाख ७० हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत.