सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

सोन्याने सजवा रेशमी केस

ND
ॅशनच्या युगात भूतकाळातल्या गोष्टी आल्या तर त्यात काही नवल नाही कारण राजा-महाराजांच्या काळात मोठ्या कलाकुसरतेने तयार करण्यात आलेली पेहराव, नक्षीदार दागिने आजच्या आधुनिक युगातील कारागिरांना आकर्षित करीत असून त्यात काही बदल करून एक वेगळी नक्षी तयार केली जाते व तीच बाजारात पुन्हा एकदा ॅशनच्या रुपाने येते. त्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे राजा-महाराजाच्या काळात सोन्याच्या मुलाम्याने केस सजविले जात होते. त्याच नक्षीकडे आजचे कारागिर आकर्षित झालेले दिसतात.

ॅशन म्हणजे जुन्या नव्याचं मिश्रणच म्हणता येईल. काळानुसार ॅशनमध्ये बदल झाले आहेत मात्र त्याच्या मागे भूतकाळ लपला आहे. ॅशनच्या युगावर जास्त करून चित्रपटांनी भुरळ घातली आहे. एका चित्रपटात केलेली ॅशन येणाऱ्या दुसऱ्या चित्रपटात वाहून नेली जाते आणि त्याचा जास्त प्रभाव आजच्या तरुणाईवर दिसत आहे.

नव्याने बाजारात आलेल्या हेयर ज्वेलरीवर देखील त्याचा प्रभाव दिसतो. देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, उमराव जान असे काही चित्रपट आहेत की त्यात नायिकेच्या केसांवर अधिक गर दिलेला दिसतो. भारतीय मुघल साम्राज्यातील शैली त्यात वापरलेली दिसते. वारण्यात आलेल्या दागिन्यांना सामान्य नागरिकांनी देखील पसंती दर्शविली आहे. नागरिकांची पसंती व मागणी लक्षात घेऊन ज्वेलरी शाँप मालकांनी शुद्ध सोन्याच्या तशा प्रकारच्या नक्षीचे दागिने तयार करून बाजारात विक्रीसाठी ठेवले आहे.

यामध्ये राजा-महाराजांच्या काळातील आकर्षक टिकल्या, मुघलांच्या काळातील झुंबर, पीन्स, वेण्या, मुकुट यांचा समावेश आहे. जर तुम्ही लांब केसांच्या धनी आहात तर त्या रेश्मी केसांना सोन्याच्या वेणीने सजवा. लहान केस असतील तर त्यांना हेयर पिन्स अथवा मुकुटाने सजवा. जर तुम्ही केसांचा अंबाडा केला आहे तर त्याला पिन्स लावा. किंवा मुघल बेगमाच्याप्रमाणे तुमच्या सुंदर व भुरभुरणाऱ्या केसांवर झुंबर लटकवू शकता. जसे पाहिजे तसे तुम्ही तुमच्या रेश्मी केसांना सजवून कुठल्याही कार्यक्रमात जाऊ शकतात.

ND
घागरा, साडी, सलवार कुर्ता किंवा शर्ट-पँटवर देखील तुम्ही ही दागिने परिधान करू शकतात. देशातील काही ठराविक ज्वेलरी शाँपवाल्यांनी तर विविध नक्षीमध्ये केस सजविण्यासाठी दागिन्यांची भव्य मालिका सुरू केली आहे. या दागिन्यांमध्ये हिरे, मोती, माणिक यांचे वर्क केली जात असल्याने त्यांच्या वजनानुसार त्यांची किंमत ठरविली जाते. रेश्मी केसांकरिता तयार करण्यात येणारे हे दागिने शुद्ध सोन्यात केले जातात मात्र कमी बजेटमध्ये चांदीच्या दागिन्यावर सोन्याची पाँलिश करून तुम्ही ते खरेदी करू शकतात. भारतात देखील या दागिन्यांना मोठी मागणी आहे. ॅशन युगात सोन्याच्या दागिन्यांनी केस सजयविण्याचे क्रेज जरा जास्तच आहे.