उन्हाळत कॉटनच्या कपडय़ांशिवाय चैन पडत नाही. तुम्हीही ऑफिसमध्ये कॉटन, खादी घालून जाताय का? त्याच त्या कपडय़ांचा आणि लूकचा तुम्हाला कंटाळा आलाय का? मग तुमच्याकडे शिअर म्हणजे पारदर्शक कापडाचा ट्रेंडी पर्याय आहे. त्यामुळे कॉटन आणि खादी जरा बाजूला ठेवा आणि शिअर मटेरिअलच्या कपडय़ांमध्ये हटके दिसा.
*शिअर मटेरिअल पातळ आणि पारदर्शक असल्याने तुम्हाला थंडावा मिळतो.
*जीन्स किंवा ऑफिस ट्राउझरसोबत तुम्ही शिअर मटेरिअलचा शर्ट कॅरी करू शकता. शिअरचा टॉप जीन्सवर तो खुलून दिसेल. व्हाईट बॉटम आणि शिअर टॉप यामुळे तुम्हाला ङ्खेमिनाईन लूक मिळून जाईल.
*ट्रान्स्परंट कुर्ती हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. ट्रान्स्परंट कुर्तीसोबत लेगिंग किंवा पलाझो पँट ट्राय करा. शिअरची स्ट्रेट कुर्ती असेल तर पलाझो, क्यूलॉटस् किंवा लूझ पँट बॉटम म्हणून निवडा. असिमेट्रिकल कुर्ती असेल तर सोबत लेगिंग ट्राय करा.
*वेस्टर्न लूक हवा असेल किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर तुम्ही शिअरचा वन पीस घाला. या ड्रेसमध्ये तुमचं सौंदर्य खुलून दिसेल. इंडियन लूकसाठी तुम्ही शिअर स्ट्राईप्सवाली साडी ट्राय करू शकता.
उन्हाला म्हणा आता 'चल हॅट'!
उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर कडकडीत उन्हामुळे डोके एकदम तापून जाते. डोक्यात नुसता घामच येत नाही तर केससुद्धा घामामुळे ओले होतात. त्यामुळे बर्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण हॅटचा (टोपी) वापर करायला हरकत नाही.
डोके झाकणे या मोसमाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ऊन तुमच्या डोक्याच्या केसांपासून संपूर्ण त्वचेसाठी हानिकारक आहे. टोपी घातल्याने तुमच्या डोक्याचा उन्हापासून बचाव होतो. वारे येण्यासाठीसुद्धा जागा मोकळी ठेवतो. टोपी घालण्याची प्रथा पाश्चिमात्य देशांपासून सुरू झाली आहे. पण आता फॅशन आणि गरज दोन्ही गोष्टी असल्यामुळे 'हॅट' आता जगभरात आपली वेगळी ओळख बनविते आहे. उन्हाळ्यात जूट, कॉटन किंवा डेनिमच्या हॅट फक्त तुमच्या डोक्याचाच बचाव करत नाही तर सौदंर्यातही भर घालतात. टोपीची फॅशन सदाबहार आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपासून महिलांमध्येही ही फॅशन आहे. हल्ली बर्याच डिझाइन, रंग आणि आकारात टोप्या मिळतात. उन्हाळ्यात तर बाजार टोप्यांनी भरून गेलेला दिसतो.
हॅट प्रत्येक पोशाखावर चांगली दिसते. खासकरून वेस्टर्न वेयर बरोबर. जींस-टी शर्ट, स्कर्ट, मिडी, केप्री किंवा जंप सूट सर्वांबरोबर हॅट मॅच करते. म्हणूनच आता उन्हात बाहेर जाताना, पार्टीत किंवा कॉलेजमध्ये जाताना तुम्ही हॅटचा वापर करू शकता.
कूल गॉगल्स
उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देणारे गॉगल्सही हवेतच. तापमान वाढायला लागलं की यंगिस्तानची पावलं आपोआप गॉगल्स खरेदीसाठी वळतात. यंदा मार्केटमध्ये विविध शेप्समधले गॉगल्स उपलब्ध आहेत. यापैकी हार्ट शेप, गोलकार गॉगल्सना जास्त मागणी आहे. हे गॉगल्स पार्टीत किंवा पिकनिकसाठी एकदम बेस्ट आहेत. डोळ्यांचे डॉक्टर्स नेहमीच चांगल्या प्रतीचे गॉगल्स वापरण्याचा सल्ला देतात. त्यामुळे दररोज गॉगल वापरणार असाल तर मात्रे ते चांगल्या दुकानातून आणि दर्जेदार ब्रँडचे घेतलेलेच बरे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच कडक ऊन सर्वांनाच सतावू लागते. अशा वेळी धुर आणि धुळापासून बचाव होण्यासाठी चष्मा आणि गॉगलची मागणी वाढत असते. आकर्षक लूक, आधुनिक आणि नवनवीन डिझाईन्स असलेले गॉगल्स जेथे डोळ्यांना सुरक्षा प्रदान करते, तिथेच गर्दी तुमचे वेगळे व्यक्तिमत्व दर्शविते.
उन्हाळ्यातील कडक ऊन लक्षात घेता बाजारात नवीन ट्रेंडचे आकर्षक लूक असणार्या गॉगल्सचे एव्हाना आगमनही झालेले आहे. या साखळीत ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड असे दोन्ही प्रकारचे गॉगल्स उपलब्ध असतात.
मार्केटमधम्ये गॉगल्सच्या विविध डिझाईन्स असल्या, तरी मोठ्या डिझाईन्सचे आणि हलक्या शेडमधील गॉगल्सची तरुणाईमध्ये मोठी मागणी आहे. याशिवाय रेबन गॉगल्सलाही पसंती आहे. याचे कारण म्हणजे रेबनचे सनग्लासेस कडक उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देतात. याचे दुसरे विशेष म्हणजे वातावरणातील अल्ट्राव्हॉयलेट रेज डोळ्यांपर्यंत पोहचू शकत नाहीत. कडक उन्हाळ्यात ब्रँडेड गॉगल्सची मागणी वाढत आहे. तरुणी हलक्या रंगातील मोठ्या गॉगल्सला पसंती देत आहेत.
सर्व प्रकारातील गॉगल्स स्टायलिश लूक तर देतातच शिवाय कडक ऊन, धूळ आणि धुरापासूनही डोळ्यांचा बचाव करतात.