रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (00:11 IST)

सध्या फॅशनमध्ये आहे ट्रेंडी फ्लेयर्ड पँट्स....

* अप डाउन म्हणजे पुढून लहान आणि मागून लांब असणार्‍या कुर्त्यांची फॅशन सध्या इन आहे. या कुर्त्यांसोबत तुम्हाला फ्लेयर्ड पँट ट्राय करता येईल.
 
* वेस्टर्न लुक कॅरी करायचा असेल तर फॉर्मल व्हाईट शर्ट आणि क्रॉप्ड जॅकेटसह फ्लेयर्ड पँट कॅरी करता येईल. ऑफिससाठी हा लुक ही बेस्ट आहे.
 
* पार्टीला जाताना क्रॉप टॉप आणि लांब फ्लोइंग जॅकेटसह फ्लेअर्ड पँट घालता येईल.
 
* शर्ट कुर्ती हा कुर्त्यांमधला नवा ट्रेंड सध्या लोकप्रिय ठरतोय. वेस्टर्न शर्टाला इंडियन लुक देण्याचा प्रयत्न होतोय. त्याचाच एक प्रकार म्हणजे शर्ट स्टाइल कुर्ती. वर्किंग वूमन कुर्त्यांची ही स्टाइल कॅरी करू शकतात. हा कुर्ता कॉट्रास्ट फ्लेयर्ड पँटसह कॅरी करा आणि हॉट लुक मिळवा.
 
* फ्रंट लिस्ट कुर्तीसोबत फ्लेयर्ड पँटचं कॉम्बिनेशन कायमच हिट ठरतं. या स्टाइलमध्ये ट्रेडी लुक आणि पारंपरिकता याचं अनोखं मिश्रण पाहायला मिळतं.
 
* अनारकली कुर्ता आणि चुडीदार हे कॉम्बिनेशन सध्या आऊट ऑफ फॅशन आहे. आजचा जमाना प्रिंटेड टाईट्स, स्ट्रेट फिट पँट्स आणि फ्लेयर्ड पँट्सचा आहे. काँट्रास्ट कलर आणि फॅब्रिक्ससोबत अनारकली कुर्ती ट्राय करा.
 
* स्ट्रेट फिट कुर्ती आणि फ्लेयर्ड पँट हे ही खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. ऑफिस किंवा कॅज्युअल आऊटिंगसाठी हा पेहराव बेस्ट आहे.
 
* फॅशनेबल राहायला आवडत असेल तर कफ्तान आणि फ्लेयर्ड पँट हे कॉम्बिनेशन ट्राय करता येईल.