आधीच्या काळात पँट कमरेवर स्थिर राहावी म्हणून कंबर पट्टा वापरला जात होता. मात्र आताच्या फॅशनच्या युगात ही संकल्पना कधीच इतिहास जमा झाली असून बेल्ट हा शोभेची वस्तू म्हणून राहिला आहे. तो एक 'स्टाइल' भाग झाला आहे.
फॅशनच्या युगात क्षणाला क्षणाला बदल होत असतात. बदल हा टीव्हीवर होणाऱ्या फॅशनशोवर आधारित असतो. तसे पाहिले तर पाश्चिमात्या शैलीच्या जीन्स पँट बाजारात आल्याने बेल्ट बांधण्याची प्रथाच संपुष्टात आली आहे. त्यामुळे नक्षी कारागिरांनी बेल्टला एक वेगळे रुपच देऊन टाकले आहे. आता तर बेल्टस हा फ्रॉक, मिडी, स्कर्ट्स, इवनिंग गाउन्स व साडी वर देखील बांधले जातात.
यात केवळ चामड्याचीच बेल्ट नसून जॉर्जेट व शिफॉनचे पक्षांच्या पंखांपासून तयार केलेले तसेच साडीवर जरदारीचा, फ्रॉकवर लेसचा आणि मिडीवर मेटलचा बेल्ट बांधण्याची फॅशन आहे. तसेच मोती, बीड्स, फेदर्स, सिक्वेंस, जरी व हिरे यांनी सजविलेले बेल्टस बाजारात उपलब्ध आहेत.
अशी आकर्षक बेल्टस छोट्या दुकानांपासून तर मोठाल्या मॉल्समध्ये 50 रुपयांपासून पाचशे रुपयापर्यंत उपलब्ध असतात.