खटकणार्या सवयींचे गुलाम
वेबदुनिया
आपल्या सभोवताली अशा काही व्यक्ती वावरताना दिसतात की, त्या कुठल्या ना कुठल्या सवयीच्या गुलाम झालेल्या असतात. त्या सवयींपासून त्यांना व इतराना कुठलेच नुकसान होत नाही, पण तरीही त्या खटकतात. अशा सवयी लागलेल्यांना म्हणूनच अनेकदा अपमान सहन करावा लागतो. चारचौघात मान खाली घालायची वेळ येते. तरीही या सवयी सुटता सुटत नाहीत. या सवयी अशा- दाताने नखे कुरतडणे.बोटे चोखणे. दातामध्ये ओठ चावणे. तोंडाने आवाज काढणे. मिशी किंवा डोक्यावरील केसांवर वारंवार हात फिरवणे. पाय हालवणे.दोन्ही हाताची बोटे वाजवणे.रस्त्याने जाताना मागे वळून पाहणे. वारंवार हात धुणे व पुसणे.एखादया वस्तुला वारंवार स्पर्श करणे.खाण्याच्या पदार्थांना वारंवार हात लावणे. खिडकीची वारंवार उघड- झाप करणे.मान किंवा डोके जोराने हालवणे. |
सवयींपासून त्यांना व इतराना कुठलेच नुकसान होत नाही, पण तरीही त्या खटकतात. अशा सवयी लागलेल्यांना म्हणूनच अनेकदा अपमान सहन करावा लागतो. चारचौघात मान खाली घालायची वेळ येते. तरीही या सवयी सुटता सुटत नाहीत. |
|
|
या काही गंभीर सवयी नाहीत. त्यामुळे त्या सोडायलाही फारशी अडचण येत नाही. पण तरीही आपण त्या सोडत नाही. या सवयी निश्चित खटकणार्या आहेत. कारण त्यामुळे तुमच्याविषयीची चुकीची समजूत समोरच्या माणसावर प्रभाव पाडते. तुमच्याविषयी त्याचे मत वाईट बनते. म्हणूनच या सवयी सोडणे हे उत्तम. साधारणपणे लहान मुलांमध्ये या सवयी अधिक असतात. या सवयी म्हणजे आपल्याला जडलेला मानसिक आजार असतो. दिवसभरात त्या जर केल्या नाहीत तर व्यक्ती अस्वस्थ होत असते. त्याचा परिणाम कामावर दिसून येतो. साधारणपणे शंभरात दोन ते तीन व्यक्ती अशा सवयींचे गुलाम असतात. त्या सोडणेही आपल्याच हातात असते. मग तुम्हाला लागलेल्या एखादी अशी सवय सोडणार ना?