सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

नव्या 'लूक'मध्ये खादी

वेबदुनिया

WDWD
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी खादी आता नव्या पिढीत फॅशन म्हणून रुजू झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या खादीचे कपडे नव्या लूकमध्ये बाजारात उपलब्ध झाल्याने युवक-युवती, राजकीय पुढारी आता फॅशनेबल खादी वापरू लागले आहेत. स्वातंत्र्य लढ्यात स्वदेशी वस्त्र म्हणून नावारूपाला आलेली शुभ्र खादी आजच्या फॅशनेबल युगात पुन्हा रंग दाखवू लागली आहे.

आता खादी कॉटन, सिल्क व वूलन मटेरियलमध्ये विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे. कालपर्यंत बाजारात केवळ खादीच्या नेहरू कुर्ता व पायजम्यामध्ये उपलब्ध होती. मात्र आता शर्ट-पॅंट, सलवार सूट मटेरियल, चादर, बॅग, ओढणी आदी प्रकारातही ती उपलब्ध आहे. शिवाय विविध रंगात ती बाजारात अवतरली आहे.
  उन्हाळ्यात खादीच्या कपड्यांना अधिक पसंती दिली जाते. खादी व जीन्स यांचे कॉम्बिनेशन तरूण-तरूणींना आकर्षित करत आहे. केवळ कपडेच नव्हे तर बॅग व इतर वस्तूच्या रूपातही खादी बाजारात दाखल झाली आहे.      


उन्हाळ्यात खादीच्या कपड्यांना अधिक पसंती दिली जाते. खादी व जीन्स यांचे कॉम्बिनेशन तरूण-तरूणींना आकर्षित करत आहे. केवळ कपडेच नव्हे तर बॅग व इतर वस्तूच्या रूपातही खादी बाजारात दाखल झाली आहे. बदलत्या काळानुसार खादीतही परिवर्तन घडले आहे. आजही खादी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती नागरिकाच्या मनात जागृत ठेवताना दिसत आहे.