सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

योगासन करा... मुरूम पळवा

ND
अत्याधुनिक जीवनशैलीच्या आपण जरा जास्तच आहारी गेल्याने आपले खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे चेहऱ्यावर बारीक बारीक पुटकड्यांना आमंत्रित करणे... याच्यावर तात्पुरता उपचार म्हणून आपण बाजारात उपलब्ध झालेले विविध कंपन्यांचे क्रीम किंवा लोशन यांचा वापर करू शकता मात्र मुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल तर त्यावर सर्वोत्तम एकच उपाय म्हणजे योगासन करणे होय.

तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात मुरुमाच्या समस्या उद्भवतात. चेहऱ्यावरील नूर जाणे तसेच मरुमांनी भरलेला चेहरा मित्रमंडळीमध्ये घेऊन जाण्यात त्यांना लाज वाटणे. तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होणे अशा एक ना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व जाहिरातींवर भुलणारा युवावर्ग बाजारात उपलब्ध झालेल्या विविध कंपन्यांचे लोशन व क्रीमचा सर्रास वापर करतात. एवढे करून देखील 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार' अशी त्यांची अवस्था होते. थोडक्यात सांगायचे झाले तर मुरुमांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही.

योगासन तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार यांचे मुख्य कारण म्हणजे योग्य पद्धतीने पचन न होणे. या व्यतिरिक्त युवावर्गात व्यायामाप्रती आळस निर्माण झाला आहे. मुरूम घालविण्यासाठी योगासन हा सर्वोत्तम उपाय आहे. प्राथमिक उपचारात दिवसभरातून साधारण दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने चेहरा धुतला पाहिजे व त्याला रुमालाने न पुसता त्याला तसाच सुखू दिल्याने चेहऱ्यावरील तेलगट पणा घुतला जातो व मुरूम येण्याचे प्रमाण कमी होते.

जरा हे करून पाहाल?
तिस दिवसांमधून एकवेळा दीर्घ काळ शंखप्रक्षालन केले पाहिजे. दरम्यानच्या काळात 20 ते 25 ग्लास गरम पाण्यात लिंबू व मीठ टाकून सकाळी उठल्या उठल्या चार ग्लास पाणी प्यायल्यानंतर लगेच तीर्यकताडासन, कटीक्रासन, उदरार्कशणासन व तीर्यक भुजंगासन 10-10 वेळा केल्यानंतर परता:विधी आटोपला पाहिजे. मात्र हृदयरोग व उच्च रक्तदाब असलेल्यांनी वरील प्रयोग करू नये.

दरम्यान पुन्हा 3 ते 4 ग्लास तेच पाणी पिऊन थोडे भटकल्यानंतर नैसर्गिक विधीला गेले पाहिजे. साधारण या क्रिये करिता दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यानंतर दिवसभर विश्रांती घ्यावी व जेव्हा भूख लागेल तेव्हाच खिचडीत तूप टाकून त्याचा आहार घेतला पाहिजे.

अग्निसार करण्याकरिता उभे राहून गुडघ्यामध्ये समोरच्या बाजूस थोडे वाकून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावे व समोर पाहून श्वास बाहेर काढून बाह्य कुंभकासन करा. जो पर्यंत श्र्वास बाहेर आहे तोपर्यंत पोटाला मेहनतीने जवळपास 25 ते 30 वेळा मागे-पुढे केलेनंतर 4 ते 5 वेळा मोठमोठ्याने श्वासोश्वास करावा.

शशकासन करताना दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून बसावे व पायाचे पंजे पसरवून बोटे बाहेर काढून त्यावर बसावे. याला व्रजासन म्हणतात. दरम्यान दोन्ही हात वर उचलून समोरच्या बाजूस हात जमिनीला टेकवत झुकावे व नाक व डोके जमिनीवर न टेकवता कंबर उचलण्याचा प्रयत्न करावा. साधारण 20 ते 25 वेळा मोठमोठ्याने श्वासोश्वास करून झाल्यावर थोडे थांबून पुन्हा एक वेळा ही क्रिया करावी. असे केल्याने नक्कीच तुम्ही त्रस्त असलेल्या मुरुमांपासून स्वत:ला मुक्त करू शकाल.