1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

या 3 वस्तू घरात ठेवा, मग बघा कोणीही धनवान होण्यापासून थांबवू शकत नाही

feng shui
काय आपल्याला असे वाटतं की खूप मेहनत केल्यावर देखील आपल्याला यश मिळत नाहीये. आणि या विपरित काही लोकं असे असतात जे सामान्य काम करून देखील यशाच्या पायर्‍या चढत असतात. तर निश्चितच यात त्यांचे भाग्य त्यांना साथ देत असतं परंतू आपण देखील काही बदल करून किंवा आपल्या घरात काही वस्तू ठेवून घरात सकारात्मक वातावरण निर्मित करू शकता आणि यशाला आपल्याकडे आकर्षित करू शकता. 
 
येथे आम्ही अशा खास 3 वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्या घरात ठेवल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते. पैशांची तंगी दूर होते जाणून घ्या कोणत्या 3 वस्तू आहेत त्या:
 
1 धातूचा कासव - धातूचा कासव घरात आनंद आणि समृद्धी घेऊन येतो. याचा प्रभाव ठेवल्यानंतर लगेच कळू लागतो. याने घरात सुख-समृद्धी वाढते.
 
2 पिरॅमिड - पिरॅमिड आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ठेवण्यात मदत करतो आणि याने सकारात्मकता संतुलित राहते. याने आपल्या प्रत्येक कामाच्या सकारात्मक परिणाम मिळू लागतात. आपण मनापासून इच्छित वस्तू मिळण्याचा मार्ग आपोआप मोकळा होतो. 
 
3 पांढरे दगड - हे खूप कमी लोकांना माहीत असेल की घरात पांढर्‍या रंगाचे ओव्हल आकाराचे दगड ठेवल्याने समृद्धी येते. हे लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. हे घरात असल्यास घरात कधीच पैशांची कमी जाणवणार नाही. आर्थिक स्थिती निश्चित सुधारेल. 
 
या तीन वस्तू फेंगशुई प्रमाणे घरात ठेवल्याने आपलं दुर्भाग्य दूर होईल आणि मेहनत केल्यावर चांगले परिणाम दिसून येतात. फेंगशुईत या वस्तूंना अत्यंत महत्त्व आहे केवळ योग्य वस्तू योग्य जागेवर ठेवून आपल्याला परिणाम मिळू शकतात आणि प्रगती दिसून येईल.