बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2019 (09:59 IST)

घरात शंख वाजवायचा की नाही?

घरात देवळात, शुभप्रसंगी, मिरवणुकीत आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीही शंख वाजवला जातो. लक्षात घ्या की उद्देश महत्त्वाचा आहे. शंखनाद आणि घंटानाद हे मंगलध्वनी आहेत. निगेटिव्ह एनर्जीला मंगलध्वनी सहन होत नाहीत. शुभ ब्रह्मंड लहरींना चालना देण्याची, अशुभ उज्रेला बाहेर हाकलण्याची क्षमता शंखनाद व घंटानादात नक्की आहे. 
 
म्हणून घरात शंखनाद जरूर करावा आणि युद्धाचा तर्क वादापुरता जरी मान्य केला तरीही शंख वाजवायला हरकत नाही. कारण 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशीच आजची जीवनशैली आहे. खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये घुसताना, धावती बस पकडताना, ऑफिसमध्ये कावेबाज सहकार्‍यांशी निपटताना, रणांगणावरील चापल्य आणि चातुर्याची गरज असतेच. शंखनाद केल्यानंतर शरीरात निर्माण होणारी स्फूर्ती रोजर्मराच्या जिंदगीत नक्कीच उपयोगी पडणारी आहे.