सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : शनिवार, 29 मे 2021 (12:19 IST)

वट सावित्री व्रत पूजन करण्यापूर्वी वडाच्या झाडाचे महत्त्व जाणून घ्या

भारतातील पूजनीय झाडांमध्ये वडाच्या झाडाचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. वैदिक धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मामध्येही वट वृक्षाचं खूप महत्त्व आहे. हे अमरत्वाचे प्रतीक देखील मानले जाते. स्कंद पुराणानुसार वट सावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं. या दिवशी स्त्रियां मनोभावे व्रत करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.
 
आमच्या देशाच्या संस्कृती, सभ्यता आणि धर्माचं वडाशी घट्‍ट नातं आहे. एकीकडे वट वृक्षाला महादेवाचं रुप मानलं जातं तर दुसरीकडे पद्म पुराणात याला प्रभू विष्णुंचा अवतार म्हटलं गेलं आहे. म्हणून स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला वडाची पूजा करतात.
 
या दिवशी स्त्रिया वडाची पूजा-अर्चना करुन, वडाला प्रदक्षिणा घालून पतीच्या दीघार्युष्य, संतान प्राप्ती आणि सुख-शांतीची प्रार्थना करतात. या दिवशी वटवृक्षाला पाणी दिले जाते आणि दोर्‍याने झाडाला गुंडाळतात तसंच 108 प्रदक्षिणा घालतात. पुराणात असे लिहिले आहे की भगवान ब्रह्मा वटावृक्षाच्या मुळात राहतात, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी महादेव निवास करतात.
 
या प्रकारे या पवित्र वृक्षात सृष्टीचे सृजन, पालन आणि संहार करणारे त्रिदेवांची दिव्य ऊर्जेचं अक्षय भंडार उपलब्ध असतं. असे मानले जाते की वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यास सुख-समृद्धी लागते.
 
वृक्षायुर्वेद या प्राचीन ग्रंथात असे म्हटले आहे की वटवृक्षांची लागवड करणार्‍याला शिवधाम प्राप्ती होते. वडाच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे, तसेच औषधाच्या दृष्टिकोनातूनही हे झाड खूप उपयुक्त आहे.
 
* आयुर्वेदिक मतानुसार वट वृक्षाचे सर्व भाग तुरट, मधुर, शीतल आणि आतड्यांना संकुचित करणारे आहेत.
 
* याचा उपयोग कफ, पित्त इत्यादी विकारांचा नाश करण्यासाठी केला जातो.
 
* उलट्या, ताप, बेशुद्धी इत्यादींवर याचा उपयोग फायदेशीर ठरतो.
 
* हे तेज वाढवते.
 
* त्याची साल आणि पानांनी औषधे देखील बनविली जातात.
 
* वट सावित्री पोर्णिमेला एखाद्या योग्य ब्राह्मण किंवा गरजूंना आपल्या श्रद्धेनुसार दान-दक्षिणा दिल्याने पुण्य प्राप्ती होते. तसंच प्रसाद चणे आणि गुळ याचे वितरण 
 
करण्याचे महत्तव आहे.
 
आनंद, समृद्धी आणि अखंड सौभाग्य देणार्‍या वट वृक्षाची धार्मिक वैशिष्ट्ये जाणून घ्या -
 
* पुराणात असे स्पष्ट सांगितले गेले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो.
 
* वट पूजेशी संबंधित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाबी आहेत.
 
* वट वृक्ष हे ज्ञान आणि सृष्टीचे प्रतीक आहे.
 
* भगवान बुद्धांना या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले.
 
* वट एक विशाल वृक्ष आहे, जो पर्यावरणाच्या दृष्टीने एक प्रमुख वृक्ष आहे कारण या झाडावर अनेक जीव आणि पक्ष्यांचे जीवन अवलंबून असते.
 
* हवा शुद्ध करण्यासाठी आणि मानवी गरजा पूर्ण करण्यात देखील याची महत्त्वाची भूमिका आहे.
 
* तत्वज्ञानाप्रमाणे वट वृक्ष दीर्घायु व अमरत्व या बोधामुळे स्वीकार केलं जातं.
 
* वट सावित्री व्रतात स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.
 
* या झाडाखाली बसून पूजन, व्रत कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
* वट वृक्ष पूजन आणि सावित्री-सत्यवान कथेचं स्मरण करण्याच्या नियामामुळे हे व्रत वट सावित्री नावाने प्रसिद्ध झालं.
 
* धार्मिक मान्यतेनुसार वट वृक्षाची दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्य देतं सोबतच याने सर्व प्रकारच्या विघ्न व दु: खाचा नाश होतो.