1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (16:34 IST)

जानकी जयंती विशेष : सीता आणि मंगळची अत्यंत रोचक आणि पौराणिक कथा

आपण सर्वांनी लहानपणापासूनच चंद्राला मामा म्हणून संबोधले आहे. खरं तर श्री लक्ष्मी आणि चंद्र या दोघांची उत्पत्ती समुद्रातून झाली आहे. आम्ही लक्ष्मीला आई समजतो म्हणून चंद्र आमचा मामा झाला.
 
या प्रकारेच सीतेला माता म्हणतो म्हणून मंगळ मामा झाला कारण मंगळ ग्रह पृथ्वी पुत्र मानला गेला आहे आणि पृथ्वीची पुत्री सीता असल्यामुळे दोघे भाऊ-बहीण झाले.
 
भगवान् श्रीराम यांची अर्धांगिनी श्री सीता संपूर्ण जगाची आई आहे, परंतु काही असे भाग्यवान प्राणी आहे ज्यांना आखिल ब्रह्मांडाचे सृजन, पालन आणि संहार करणार्‍या श्री सीतेचे भाऊ असणं आणि त्यांना आपली बहीण म्हणण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे.
 
वाल्मिकी रामायण, श्रीरामचरितमानस इत्यादी प्रसिद्ध ग्रंथांमध्ये सीताजींच्या कोणत्याही भावाचा उल्लेख नाही परंतु अनेक ग्रंथांमध्ये सीतेच्या भावाचं परिचय आढळतं.

- देवी सीता यांचे भाऊ:-
* मंगळ ग्रह
* राजा जनक पुत्र लक्ष्मीनिधी
 
- वैदिक भारताच्या राष्ट्रगान रुपात प्रसिद्ध अथर्ववेदच्या पृथ्वी सूक्त (12/1/12) मध्ये ऋषी पृथ्वीची वंदना करत म्हणतात-
माता भूमि पुत्रोऽहं पृथिव्याः अर्थात- पृथ्वी, तू माझी आई आहेस आणि मी तुमचा मुलगा आहे.
आम्ही सर्व ऋषी-मुनींचे वंशज स्वत:ला पृथ्वी पुत्र समजतो.
 
सीता जी देखील पृथ्वीची कन्या आहेत आणि या संदर्भात पृथ्वी मातेचं पुत्र त्यांचे भाऊ असल्याचे समजतं.
 
सीता आणि मंगळ यांच्या भाऊ-बहीणीच्या स्नेहाच्या एका दुर्लभ दृश्याचे संकेत गोस्वामी तुलसीदास यांनी आपल्या ग्रंथ जानकी मंगळ यात केले आहे-
जनकपुरच्या विवाह मंडपात वर सरकार श्री राघवेंद्र आणि वधू सिया बसलेले आहे. स्त्रिया श्री सीताराम यांच्याकडून गणपती आणि गौरीचे पूजन करवत आहे.
राजा जनक यांनी अग्नी स्थापन करुन हातात कुश आणि जल घेऊन कन्या दानाचं संकल्प करत श्रीरामाला आपली सुकुमारी सिया समर्पित केली आहे.
आता श्रीराम सीतेच्या भांगेत सिंदूर भरत आहे आणि आता क्षण आला आहे लाजा होम विधीचा, जेव्हा वधूचा भाऊ उभा राहतो आणि तिच्या बहिणीच्या अंजलीत लाजा (भाजलेले धान, त्याला लावा किंवा खील देखील म्हणतात) भरतो. वर देखील वधूचा हात हातात घेतो आणि वधू लाजा होमात समर्पित करते.
 
जेव्हा पृथ्वी आईला आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल कळलं तेव्हा त्या पुत्र मंगळकडे धावत पोहचली होती. आपल्या बहीण सीतेच्या विवाहाचा समाचार एकून मंगळ देखील प्रसन्न झाला होता, तो देखील वेष बदलून आपल्या बहीणीच्या विवाहात सामील झाला होता. 

लाजा होम पद्धतीचा सुंदर क्षण उपस्थित होताच पुरोहित्य कर्म करणारे ऋषी बोलले: - वधूच्या भावाने उपस्थित राहावे-
मंगळ उभे राहीले, श्याम वर्ण श्रीराम, मध्य मध्ये गौरवर्ण सिया आणि त्यांच्याजवळ रक्तवर्ण मंगळ- तिघं अग्निकुंडाजवळ उभे होते. मंगळ आपली बहिण सियाच्या हाती लाजा भरत आहे, सीतेच्या हाताला श्रीरामांचे हात लागलेले होते.
 
ऋषीवरांच्या मुखातून उच्चारित:-
* ॐ अर्यमणं देवं, ॐ इयं नायुर्पब्रूते लाजा, ॐ इमांल्लाजानावपाम्यग्न!
या तिन्ही मंत्रांच्या (पार०गृ०सू० 1 /6 /2) उद्घोषामध्ये सीता आपल्या भाऊ मंगळ द्वारे तीनदा प्रदत्त लाजाचे पती श्रीराम यांच्या संग अग्नित होम करत होत्या-
सिय भ्राता के समय भोम तहं आयउ।
दुरीदुरा करि नेगु सुनात जनायउ॥
(जानकी मंगल 148)
 
जानकीला जेव्हा भावाची गरज होती त्या वेळी, पृथ्वी पुत्र मंगळ स्वतः तेथे आला आणि स्वत: ला लपवून सर्व विधी करून आपला सुंदर संबंध निभावला.