गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (23:04 IST)

वसंत पंचमी2022 विशेष : विद्याच्या देवीचा सण वसंत पंचमी जाणून घ्या माहिती

Vasant Panchami 2022 Special: Know the festival of Goddess of Knowledge Vasant Panchami Information Dharm San utsav Vasant Panchmi Mahiti in Marathi Inormation About Vasant Panchmi Festival IN Marathi वसंत पंचमी2022 विशेष :  विद्याच्या देवीचा सण वसंत पंचमी जाणून घ्या माहिती In MARATHI WEBDUNIA Marath
वसंत पंचमी सण शिशिर ऋतूमध्ये साजरा करतात. याला माघ शुद्ध पंचमी असे ही म्हणतात. मकर संक्रांतीनंतर जेव्हा सूर्य उत्तरायण होतात त्या काळात हा सण साजरा केला जातो. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते. हा सण भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केला जातो. हा दिवस विद्याची देवी सरस्वती यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो.
भारतात प्रत्येक प्रांतात हा दिवस वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा केला जातो. 
हा सण मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात विशेष उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य देवाची पूजा करतात. हा दिन कृषी संस्कृतीशी निगडित असतो. शेतकरी या दिवशी नवान्न इष्टी याग करतात. बंगाल मध्ये या दिवशी भक्तिगीत म्हणतात. वसंत पंचमीला ज्ञान पंचमी देखील म्हणतात . प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.
वसंत पंचमी आणि भारताचे वेगवेगळे प्रांत :
वसंत पंचमी भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर पण साजरी होते. भारतात कुठे आणि कसा हा सण साजरा होतो.
बिहार मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील देव गावात सूर्यमंदिरात सूर्याला स्नान घालून नवी लाल वस्त्र परिधान करतात. नृत्य, गीत, संगीताचे सादरीकरण केले जाते. लोक गुलाबी, पिवळे रंगाच्या वस्त्राचे परिधान करतात.
 
पश्चिम बंगालात देवी सरस्वतीची पूजा करून पिवळी वस्त्रे घालतात. देवीच्या पायथ्याशी पुस्तके ठेवून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मुले पहिल्यांदा लिहिताना पाटीवर मुळाक्षरे काढतात आणि आपल्या शिक्षणाची सुरुवात करतात. कोलकाता मध्ये देखील या दिवशी पिवळी वस्त्रे घालण्याची परंपरा आहे.
 
राजस्थानमधील लोकं मोगऱ्याच्या फुलांच्या माळी गळ्यात घालून नवे पिवळे वस्त्र धारण करतात. पिवळ्या रंगाच्या फुलांनी आपल्या घराची सजावट करतात. गोडा धोडा चे जेवण करतात.
 
पतंग उत्सव म्हणून पाकिस्तानात असलेल्या पंजाबात हा सण पतंग उत्सव म्हणून साजरा केला जातो. केशरी भात जेवण्यात समाविष्ट केला जातो. शेतातील मोहरी मोहरते त्यावेळी हा सण साजरा केला जातो. शीख संप्रदाय पिवळी वस्त्रे धारण करून गुरुद्वारात जाऊन सण साजरा करण्याची पद्धत आहे. पतंग उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 
 
बालीमध्ये हा दिवस हरीराया सरस्वती नावाने साजरा होतो. विद्यार्थी आणि शिक्षक गडद रंगाची पोशाख परिधान करतात. देऊळात पक्वान्नाचा प्रसाद अर्पण केला जातो . विद्याची  देवी सरस्वतीची प्रार्थना स्तुती करतात.