विक्रमादित्य : प्रशांत दामले
प्रशांत दामले : विक्रमादित्य : प्रशांत दामले प्रशांत दामलेला मराठी रंगभूमीवरचा सध्याच्या घडीचा विक्रमादित्य अभिनेता असे म्हणता येईल. नुकतीच त्याच्या अभिनय कारककिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. या काळात त्याने जवळपास आठ हजार नाटकांचे प्रयोग केले आहेत. छाती धपापून टाकणारी ही आकडेवारी आहे. राज्या किंवा देशात नव्हे तर परदेशातही त्याने मराठी नाटकांचा झेंडा रोवला. गुणवान अभिनेता असला तरी त्याच्यावर शिक्का मात्र विनोदी अभिनेता असाच बसला आहे. प्रशांतच्या व्यावसायिक नाट्यकारकिर्दीची सुरवात पुरूषोत्तम बेर्डे यांच्या 'टुरटुर' या नाटकातून झाली. त्यानंतर आलेले मोरूची मावशी हे नाटक सुपरहीट ठरले व त्याचा यशाचा मार्ग मोकळा झाला. या नाटकामुळे त्याची वेगळी छाप पडली. पुढे 'ब्रम्हचारी' नाटकात त्याला प्रथमच मुख्य भूमिका मिळाली आणि ते नाटक सुपरहीट ठरले. येथूनच त्याची यशाची घोडदौड वेगाने सुरू झाली. मग ' लग्नाची बेडी, प्रीतीसंगम, गेला माधव कुणीकडे एक लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर' अशी अनेक नाटके तुफान हीट झाली. त्याच्या नावावर अनेक विक्रमी प्रयोगांची नोंद आहे. त्याने एकाच दिशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे पाच प्रयोग केले आहेत. पूर्ण वर्षात म्हणेज ३६५ दिवसात ४६९ आणि ४५२ प्रयोग असे विक्रमही त्याच्या नावे आहेत. त्याच्या 'गेला माधव कुणीकडे, एक लग्नाची गोष्ट, मोरूची मावशी' या तीन नाटकांचे तर हजारवर प्रयोग आत्तापर्यंत झाले आहेत. विशेष म्हणजे विक्रम करताना गुणवत्तेशी त्याने कुठेही तडजोड केली नाही. म्हणून तो आजच्या घडीचा निर्विवाद सुपरस्टार अभिनेता आहे. दरम्यानच्या काळात त्याला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. त्याने अनेक चित्रपटही केले. मात्र तेथे त्याचे मन रमले नाही. त्याला आणखी एक देणगी मिळाली आहे ती म्हणजे त्याचा सुंदर गळा.त्यामुळे संगीत नाटके आता हद्दपार झाली असली तरी त्याच्या नाटकात बर्याचदा गाणे असते. म्युझिकल कॉमेडी हा नवा प्रकार त्याच्यामुळे मराठी रंगभूमवीर आला. छोट्या पडद्यावरही त्याने अनेक कार्यक्रमही केले आहेत. विशेषतः गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणूनही तो लोकप्रिय आहे. समाजसेवेतही तो पुढे आहे. त्याच्या प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनतर्फे उगवत्या गायकांचा शोध घेतला जात आहे. प्रशांत दामले अभिनित नाट्य, चित्रपट : नाटके : टुरटुर मोरूची मावशी ब्रम्हचारी लग्नाची बेडी बे दुणे पाचमहाराष्ट्राची लोकधारा गेला माधव कुणीकडे लेकुरे उदंड झालीचार दिवस प्रेमाचेव्यक्ती आणि वल्ली सुंदर मी होणार एक लग्नाची गोष्टआम्ही दोघे राजा राणी जादू तेरी नजर चित्रपट : यज्ञ माझा छकूला घरंदाज सारेच सज्जन सवत माझी लाडकी वाजवा रे वाजवा सगळे सारखेच एक गगनभेदी किंकाळी ऐकावे ते नवलच आपली माणसंखुळ्यांचा बाजार आता होती गेली कुठे? धुमाकूळफटफजिती बाप रे बापपसंत आहे मुलगी एक रात्र मंतरलेली इना मिना डिका आई पाहिजे रेशीमगाठसगळीकडे बोंबाबोंब आनंदी आनंद