ganesh chaturthi
✕

मराठी रंगभूमीचे दैवत नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच 'बालगंधर्व' यांचा आज स्मृतिदिन

Updated: बुधवार, 15 जुलै 2026 (11:39 IST)
मराठी रंगभूमीचे शिल्पकार आणि अद्वितीय गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच 'बालगंधर्व' यांचा स्मृतिदिन दरवर्षी १५ जुलै रोजी पाळला जातो. २६ जून १८८८ रोजी पुणे येथे नाराणराव श्रीपाद राजहंस यांचा जन्म झाला. प्रथम किर्लोसकर नाटक मंडळीत काम करणार्‍या बालगंधर्वांनी पुढे स्वत:ची ‘गंधर्व संगीत नाटक मंडळी’ काढली. मानापमानातील ‘भामिनी', विद्याहरणमधील ‘देवयानी’, स्वयंवरामधील ‘रुक्मिणी’, एकच प्यालातील ‘सिंधू’ या त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका. पुणे येथील १९२९ च्या महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्क्षपद भूषविलेल्या बालगंधर्वांना अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचे ‘राष्ट्रपती पदक’ही लाभले होते. ‘पद्मभूषण’ विभूषित बालगंधर्व म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला पडलेले इंद्रधनुष्यी स्वप्न होते.

रंगभूमीवरील योगदान
'बालगंधर्व' उपाधी: त्यांच्या बालवयातील मधुर गायनाने प्रभावित होऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना 'बालगंधर्व' हे नाव दिले.

स्त्री-भूमिकांचे सुवर्णयुग: ज्या काळात स्त्रिया नाटकात काम करत नव्हत्या, त्या काळात बालगंधर्वांनी आपल्या अभिनय, रूप आणि लाघवी आवाजाने स्त्री-भूमिका जिवंत केल्या. त्यांनी साकारलेली भामिनी (मानापमान), सिंधू (एकच प्याला) आणि रुक्मिणी (स्वयंवर) आजही मैलाचा दगड मानली जाते.

नाट्यसंगीताचे वैभव: 'स्वयंवर', 'मानापमान', 'सौभद्र' यांसारख्या अनेक नाटकांतून त्यांनी गायलेली पदे आज एका शतकानंतरही रसिकांच्या ओठांवर आहे.

त्यांनी आपल्या अभिनयाने आणि अवीट गोडीच्या नाट्यसंगीताने मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ घडवला.  एकंदर २७ नाटकांत ३६ भूमिका केलेला हा ‘राजहंस’ म्हणजे, ‘जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा। तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे।’
ALSO READ: असा बालगंधर्व पुन्हा न होणे
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

सलमान खानचा अंगरक्षक शेराचा मुलगा अबीर सिंग 'टार्झन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

'रामायण'मधील पहिले गाणे 'जय जय राम' प्रदर्शित, साई पल्लवी-रणबीर कपूरच्या 'सिया राम' लूकने प्रेक्षकांची मने जिंकली

'हनुमान अंश'नंतर विशाल चतुर्वेदीने 'राम बोला' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गणेश चतुर्थीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी केले बाप्पाचे स्वागत

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील पहिले गाणे 'जय जय राम' गणेश चतुर्थीला प्रदर्शित

पुढील लेख
Show comments