बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Updated : शनिवार, 6 एप्रिल 2024 (17:42 IST)

निलेश साबळे पुन्हा येतोय हसवायला

nilesh sabale
नवीन ऊर्जा घेऊन नवीन वर्षात कलर्स मराठी मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. विनोदाची जत्रा घेऊन विनोदाचा बादशहा असलेले संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके डॉ.निलेश साबळे येत आहेत. डॉ.निलेश साबळे यांच्यासोबत या कार्यक्रमात ओंकार भोजने आणि भालचंद्र कदम हे या कार्यक्रमात दिसणार आहेत.  
 
डॉ. निलेश साबळे स्वतः “हसताय ना ? हसायलाच पाहिजे” या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन, लेखन, दिग्दर्शन, सांभाळणार आहे. तसेच यांमध्ये स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण, ओंकार भोजने आणि सुपर्णा श्याम, भाऊ कदम हे त्यांची साथ देतील. तसेच सेलिब्रिटी पाहुणे म्हणून अलका कुबल आठल्ये आणि भरत जाधव हे कलाकार दाद देण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होतील. 
 
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाने हसवणारे डॉ. निलेश साबळे यांचे नुसते महाराष्ट्रातच नाही तर जगभरात चाहते निर्माण झाले आहे. मराठी मनोरंजन पासून तर बॉलीवूड पर्यंत सर्व सुपरस्टार्सला त्यांनी आपल्या कॉमेडीने हसवले. तसेच भालचंद्र कदम म्हणजेच भाऊ कदम यांनी देखील आपल्या विनोदी अभिनयाने सर्व प्रेक्षकांना भरपूर हसवले आहे. ओंकार भोजने देखील आपल्या अभिनयामुळे चाहत्यांचा लाडका झाला आहे. ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!’ या शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेले विनोदाचे हे तीन अभिनेते एकत्र येत आहेत. 

Edited By- Dhanashri Naik