शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (22:40 IST)

असं का होतं,जाणून घ्या

हिवाळ्यात घरातून बाहेर निघाल्यावर तोंडातून वाफ येताना किंवा धूर निघताना दिसतो.असं कसं होतं हे माहीत आहे का?जाणून घ्या.
 
श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतो. पण या  कार्बन डाय ऑक्साइड सह नायट्रोजन, कमी प्रमाणात ऑक्सिजन, आर्गन आणि पाणी देखील असत. ह्या पाण्यामुळे तोंड आणि फुफ्फुसं ओलसर राहतात. बाहेरचे तापमान कमी असल्यामुळे शरीरातील पाणी आपली ऊर्जा वेगाने कमी करून जवळ येतात. ही वाफ पाण्याच्या थेंबा प्रमाणे असते .म्हणून प्रत्येक श्वासासह पाणी  वाफेच्या रूपात बाहेर येत.त्याच प्रमाणे शरीरात पाणी  जास्त प्रमाणात वाढल्यावर बाष्पीभवनामुळे  घाम आणि मूत्राच्या रूपात बाहेर निघत.
आपल्याला हे माहीतच असेल की माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच 37 डिग्री सेल्सिअस असते. 
जेव्हा आपण हिवाळ्यात श्वास सोडतो तर श्वासासह शरीराचे पाणी देखील बाहेर निघते आणि थंड झाल्यावर बाष्पीभवन होते. 
पाण्याची वाफ थंड वाऱ्याला मिळाल्यावर पाण्याचे थेंब कमी करते आणि त्याचा परिणाम असा होतो की तोंड्यातून धूर निघताना दिसतं 
पण हे उन्हाळ्यात दिसत नाही त्याचे कारण असे की पाण्याची वाफ जमत नाही आणि बाहेर पडल्यावर त्याचे बाष्पीभवन होते, परंतु उन्हाळ्यात असं काही होत नाही.