1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: रविवार, 21 फेब्रुवारी 2021 (09:30 IST)

सामान्य ज्ञान - ट्रेनची साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते ?

आपण सर्वानी ट्रेन मध्ये प्रवास केलाच आहे. प्रवासाच्या दरम्यान कोणी तरी साखळी ओढली असे ऐकण्यात आलेच असेल. पण आपण  कधी विचार केला आहे का की साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते आणि ट्रेनमधील टीटी ला कसे कळते की कोणी साखळी ओढली आहे चला तर मग जाणून घेऊ या.  
सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ या की ट्रेन मध्ये ब्रेक कसे काम करतात? ट्रेन मध्ये देखील एयर ब्रेक असतात. जे बस किंवा तर्क सारख्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमध्ये असते. ट्रेन च्या ब्रेक मध्ये एक पाइप असतो ज्यामध्ये हवा भरलेली असते. ही हवा ब्रेक शू ला  मागे पुढे करते आणि जेव्हा ब्रेक शू चाकाला घासले जाते तेव्हा ब्रेक लागतात. परंतु ब्रेक कधी आणि कोणत्या स्थितीमध्ये लावायचे आहे हे पूर्णपणे ट्रेनचा चालक म्हणजे लोकोपायलट आणि त्याचे सहकारी गार्ड ह्यांच्या समजूतदारीवर निर्भर आहे.ज्या प्रकारे रस्त्यावर 3  सिग्नल असतात हिरवा,पिवळा आणि लाल. त्याच प्रकारे रेलवे मध्ये देखील तीन सिग्नल असतात. हिरवा  सिग्नल असल्यावर ट्रेन वेगाने धावत असते.पिवळा सिग्नल मिळाल्यावर लोकोपायलट ला ट्रेन ची स्पीड कमी करायचे असते. परंतु जर पिवळाच सिग्नल वारंवार मिळत असेल तर त्याला स्पीड कमी करण्याची काहीच गरज नाही. जर लाल सिग्नल मिळत आहे त्याचा अर्थ आहे की लोकोपायलट ने सिग्नलच्या पूर्वी ट्रेन थांबवून द्यावी.