शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (23:07 IST)

असं का होत: गरम झाल्यावर दूध उतू जात पण पाणी नाही

दर रोज किंवा कधी तरी दूध गरम झाल्यावर उतू जात पण पाणी उतू जात नाही या मागील कारण आज आम्ही आपल्याला सांगत आहोत. दूध आणि पाणी हे दोन्ही  द्रव पदार्थ आहे परंतु दूध पाण्यासारखे सादे द्रव नसून ते कोलाइडल आहे ज्यात प्रथिने, चरबी, साखर, व्हिटॅमिन आणि खनिजे सारखे अनेक पदार्थ असतात. 
गरम केल्यावर दूध उतू जायचे कारण असे आहे की दूध गरम केल्यावर त्यामधून प्रथिन आणि चरबी वेगवेगळे होतात आणि हलकं असल्यामुळे ते दुधाच्या पृष्ठभागावर एकत्र होतात. दुधात पाण्याचे प्रमाण अधिक असतात जे वाफेच्या रूपात वर जातात पण दुधाच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या थरातून बाहेर येत नाही. 
 
जर या स्थितीत देखील दूध गरम होत राहिले तर वाफ वेगाने वर जाते आणि बुडबुड्याच्या रूपात फेस तयार करत आणि अशा परिस्थितीत दूध उतू जात. 
 
दूध उतू जाऊ नये या साठी दुधाच्या भांड्यात एक लांब चमचा घालून ठेवा. असं केल्यानं दुधावर जमलेली साय च्या खाली वाफ जमत नाही आणि वाफ बाहेर निघेल.त्या मुळे दूध उतू जाणार नाही.