शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (08:00 IST)

डास चावल्यावर खाज का येते ? जाणून घ्या

असं म्हणतात की चावण्याचे कार्य मादी डास करतात नर डास नाही.जेव्हा मादी डास चावतात तेव्हा खाज येते.बऱ्याच वेळा खाज एवढी असते की खाजवून त्या ठिकाणी जखम होते. असं का होत चला जाणून घेऊ या.
 
मादी डास चावतात तर चावलेल्या ठिकाणी रक्त साकळू नये या साठी ते चावताना  एक विशेष रसायन आपल्या शरीरात सोडतात या मुळे आपल्या शरीरात रक्त साकळत नाही आणि डास सहजपणे रक्त शोषतात.हे रसायन जस जस आपल्या शरीरात शिरतं आपल्याला खाज येऊ लागते. त्याच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी आपली रोग प्रतिकारक क्षमता मदत करते. या रोग प्रतिकारक क्षमतेला हिस्टामीन  म्हणून ओळखले जाते.हे एक कंपाउंड उत्सर्जित करतात.हे कंपाउंड शरीरात असलेल्या पांढऱ्या पेशींना त्या भागापर्यंत पोहोचवून त्या प्रोटिन्सशी  लढा देतात.या हिस्टामीन नावाच्या कंपाउंड मुळे व्यक्तीला खाज आणि सूज येते.हेच कारण आहे की डास चावल्यावर आपल्याला खाज येते.
डास चावल्यावर शरीराचा तो भाग संवेदनशील होतो आणि वारंवार खाजविल्याने तिथल्या त्वचेवर सूज येणे किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो.