रस्त्याच्या मध्ये झाडे झुडुपे का लावतात
आपण रस्त्यावर जात असताना डिव्हाइडरवर झाडे-झुडुपे लावलेले दिसतात. जे खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात. बरेच लोक असा विचार करत असतील की हे सौंदर्यीकरणासाठी लावलेली आहे. परंतु असे काही नाही .हे झाडे झुडपे डिव्हायडर वर या साठी लावतात की रात्रीच्या वेळी एकीकडून येणाऱ्या वाहनांचा दिव्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूच्या येणाऱ्या वाहनांवर पडू नये आणि या मुळे वाहन चालकांना काही त्रास होऊ नये. बऱ्याच वेळा हे झाडे झुडुपे नसल्यामुळे मोठे अपघात घडतात. असं घडू नये या साठी हे झाडे रस्त्याच्या डिव्हायडर मध्ये लावतात. हे झाडे लावण्याचा एक फायदा अजून आहे की ह्यांच्या मुळे रस्त्या वर प्राणी आणि जनावरे देखील येत नाही. बऱ्याच वेळा या प्राण्यांमुळे देखील अपघात होतात. हेच कारण आहे की रस्त्यावर डिव्हाइडरमध्ये झाडे-झुडुपे लावतात.