शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:54 IST)

नवीन वाहनाच्या नंबर प्लेटवर A/F का लिहिलेले असते जाणून घ्या

मोटार वाहन अधिनियम 1989 च्या अंतर्गत नवीन आणि जुन्या वाहनांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.नोंदणी क्रमांकाशिवाय वाहन चालविणे बेकायदेशीर मानले जाते.जेव्हा देखील एखादे  दुचाकी किंवा चारचाकी वाहन शोरूम मधून बाहेर काढतात तेव्हा वाहन चालकाला एक तात्पुरता नंबर दिला जातो. जर एखाद्या वाहनाला टेम्पररी किंवा तात्पुरता नंबर दिला नसेल तर त्याच्या नंबर प्लेटवर  A/F लिहिलेले असतात. A/F चा अर्थ आहे 
"Applied For" ह्याचा अर्थ आहे की वाहनचालकाने वाहनाच्या नवीन नंबर साठी अर्ज केला आहे आणि वाहनाचा नवीन नंबर मिळे पर्यंत A/F या Applied For लिहिण्याची सूट दिली जाते. एका आठवड्यापेक्षा जास्तकाळ A/F लिहिलेल्या नंबर प्लेटचे वाहने चालविणे बेकायदेशीर आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी(RTO) A/F लिहिण्याची सुविधा तो पर्यंत देतात जो पर्यंत आपल्याला नोंदणी क्रमांक मिळत नाही. जर नोंदणी क्रमांक मिळाल्यावर देखील आपण वाहनावर A/F लिहून वाहन चालवीत आहात तर असं करणे बेकायदेशीर आहे.या साठी आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
हेच कारण आहे की गाडीच्या नंबर प्लेटवर A/F लिहिले जाते.