सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (09:55 IST)

Swapna Phal : आपल्या घरात लक्ष्मी कधी येणार जाणून घ्या

आयुष्यात आपण बऱ्याच वेळी अनेक त्रासाने वेढलेले असतो. खरं तर असं कोणीच नाही ज्याला काहीच त्रास नाही. तरी ही आपण स्वप्नांच्या माध्यमाने आई लक्ष्मी येण्याचे आणि खूप पैसे मिळण्याचे काही न काही संकेत मिळतात. चला जाणून घेऊ या अश्याच काही 10 स्वप्न आणि त्यांचा संकेता बद्दल जे आपल्याला भविष्यात श्रीमंत होण्याची सूचना देतात.
 
स्वप्नांच्या माध्यमातून देवी आई लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन कधी होणार जाणून घेऊ या. 
 
 
1 जर आपण स्वप्नात सापाला त्याचा बिलासकट बघितले तर आपल्याला आकस्मिक धनाची प्राप्ती होण्याचे संकेत देतं.
 
2 जर आपण स्वप्नात स्वतःला एखाद्या झाडावर चढताना बघता तर आपल्याला एकाएकी धन प्राप्तीचे संकेत मिळतात. 
 
3 जर आपल्याला स्वप्नात नाचताना एखादी बाई किंवा मुलगी दिसल्यास ते देखील धन प्राप्तीचे संकेत असतात.
 
4 आपण स्वप्नात सोनं बघितले असल्यास हे आपल्या घरात आई लक्ष्मी येण्याचे आणि धनप्राप्तीचे आणि श्रीमंत होण्याचे शुभ चिन्हे असतात.
 
5 स्वप्नात मधमाश्यांचे पोळ बघितले असल्यास धन लाभ होतो.
 
6 स्वप्नात उंदीर बघितले असल्यास, आपल्या घरात बरेच पैसे येणार असं दर्शवतात.
 
7 जर आपल्या स्वप्नात एखाद्या देवी किंवा देवाचे दर्शन घडले असल्यास, समजावं की आपल्या घरात खुद्द देवी लक्ष्मी येणार आहेत आणि आपल्याला संपत्ती सह यश देखील मिळणार आहे.
 
8 जर आपण स्वप्नात कानात बाळी किंवा कानातले घातलेले बघतात तर हे देखील धन प्राप्तीचे संकेत देतात.
 
9 जर स्वप्नात तेवत असलेला दिवा बघता तर ते देखील आपल्याला प्रचंड प्रमाणात पैसे मिळणार हे संकेत देतात.
 
10 जर आपण स्वप्नात स्वतःला अंगठी घालताना बघता तर समजावं की आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे.