शनी दोष दूर करण्यासाठी राशीनुसार जपा हनुमान मंत्र
हनुमान सर्वात शीघ्र प्रसन्न होणारे देव असून यांचे नाव घेतल्याने देखील मोठे मोठे संकट टळून जातात. सर्व समस्या दूर होतात. आपल्या राशीप्रमाणे हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जाणून घ्या:
मेष आणि वृश्चिक
मेष आणि वृश्चिक या राशीचे स्वामी मंगळ आहे. जीवन मंगलमय व्हावा यासाठी या राशीच्या जातकांनी 'ॐ अं अंगारकाय नमः' मंत्राचा जप करावा. सोबतच हनुमानाचे दिव्य मंत्र 'मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥' जपावे. सुख-समृद्धी, आरोग्य संबंधी मनोकामना नक्की पूर्ण होईल.
वृषभ आणि तूळ
वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी शुक्र आहे. या राशीच्या जातकांनी हनुमानाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 'ॐ हं हनुमते नम:।' मंत्र जपावा. श्रद्धापूर्वक या मंत्राच जप केल्याने निश्चितच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मिथुन आणि कन्या
मिथुन आणि कन्या राशीचे स्वामी बुध आहे. या राशीच्या जातकांना संकटांपासून मुक्ती आणि यश प्राप्तीसाठी हनुमानाला शीघ्र प्रसन्न करणारा सुंदरकांड पाठ करायला हवा. दररोज पाठ अशक्य असल्यास ''अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥'' मंत्र नित्य जपावे.
कर्क
कर्क राशीचा स्वामी चंद्रमा आहे. या राशीच्या जातकांनी आपलं मनोबल वाढवण्यासाठी तसेच आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी नित्य श्रद्धापूर्वक हनुमान गायत्री मंत्र 'ॐ अंजनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुती प्रचोदयात्।' जपावे. सोबतच हनुमानाला शेंदूरी चोला चढवावा याने शुभ फल प्राप्त होईल.
सिंह
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या जातकांनी 'ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट।' मंत्र जपावा. या मंत्र जपामुळे शत्रूंचा नाश आणि संकटापासून बचावा होतो.
धनू आणि मीन
धनू आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या जातकांनी समस्यांपासून वाचण्यासाठी आणि कार्य सिद्धी हेतू नित्य बजरंगबाण पाठ करावे. सोबतच 'ॐ हं हनुमते नमः।' दिव्य मंत्र जपावे.
मकर आणि कुंभ
मकर आणि कुंभ राशीच्या जातकांचे स्वामी शनी आहे. शनी देवाची कृपा प्राप्तीसाठी आणि जीवनात सुख-समृद्धी-यश प्राप्तीसाठी 'ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा।' मंत्र जपावा.