शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (00:53 IST)

अंघोळीच्या पाण्यात मिसळा ह्या गोष्टी होतील मोठे फायदे

पत्रिकेतील असणार्‍या दोषांमुळे बर्‍याच वेळा दुर्भाग्याचा सामना करावा लागतो. जर व्यक्तीला फार मेहनत घेऊन देखील यश मिळत नसेल तर ज्योतिषात सांगण्यात आलेले उपाय केल्याने नक्कीच लाभ मिळतो. अंघोळीच्या पाण्यात काही खास वस्तू मिसळल्याने भाग्यातील अडचणी दूर होऊ होऊन यश, धन आणि सुख मिळू शकत.....  
 
वेलची आणि केसर  
रोज अंघोळीच्या आधी पाण्यात थोडीशी वेलची आणि केसर घालून अंघोळ केल्याने तुमचा वाईट काळ हळू हळू दूर होण्यास मदत मिळेल.
 
दूध 
पाण्यात दूध मिसळून अंघोळ केल्याने मनुष्याला दीर्घायू प्राप्त होते. तसेच शारीरिक बळ देखील मिळत.
  
तीळ  
पाण्यात तीळ घालून अंघोळ केल्याने लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात धन-समृद्धीचे आगमन होतो.
 
तूप 
रोज अंघोळीच्या पाण्यात थोडेसे तूप मिसळून अंघोळ केल्याने स्वस्थ शरीर आणि सुंदर त्वचेची प्राप्ती होते.
 
सुगंधित वस्तू 
अंघोळीच्या पाण्यात रोज सुगंधित वस्तू जसे फूल, चंदन इत्यादी मिसळून अंघोळ केल्याने धन संबंधी अडचणी संपुष्टात येतात.