शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शाळेत जाण्यापूर्वी दोघे भाऊ अंघोळीसाठी गेले, 15 मिनिटाने सापडले मृतदेह

पुणे- एका घरात गॅस गिझरमुळे दोन भावांचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये पाणी तापवण्यासाठी वापरण्यात येणारं गिझरचा वेग वाढल्यामुळे कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे बाथरूममध्येच गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.
 
ही घटना श्री क्षेत्र भीमाशंकर येथे घडली. आदित्य (17) आणि अभिषेक (14) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शोकाकुल वातावरण निर्मित झाले असून शनिवारी जेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला तेव्हा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
 
आदित्य दहावी तर अभिषेक आठवीत शिकत होता. दोघे आंबेगाव तहसील स्थित शिवशंकर शाळेत शिकत असून प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन करायला जाण्यासाठी तयार होत होते. वेळ होऊ नये म्हणून दोघे सोबत अंघोळ करायला गेले. अंघोळीपूर्वी मित्रांशी शाळेत किती वाजता पोहचायचे, कोणत्या एसटी बसने जायचे याबाबत चर्चा देखील केली. साडे सात वाजताच्या गाडीने जायचे ठरले म्हणून उशीर व्हायला नको म्हणून त्यांनी गिझरचा हीट लेवल वाढवला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे दोघे बेशुद्ध पडले. 15 मिनटापर्यंत बाहेर आले नाही म्हणून आई तिथे पोहचली तर दोघे भाऊ एकमेकावर पडलेले होते. त्यांनी आरडा ओरडा करून लोकांना एकत्र केले.
 
दोघांना लगेच रुग्णालयात नेले परंतू तिथे डॉक्टर नसल्यामुळे त्यांना 13 किमी अंतरावर तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविण्यात आले. तेथील कर्मचार्‍यांनी 34 किमी दूर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हालविण्यास सांगितले. त्यावेळी घोडेगाव हॉस्पिटलच्या डॉ. नंदकुमार पोखरकर यांनी दोघांना तपासून ते मृत झाल्याचे सांगितले.