बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (06:30 IST)

जोडीदार हा कोणत्या राशीचा असावा, जाणून घ्या

astro partner
एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बर्‍याच गोष्टी असतात जसे आवडते भोजन, आवडता रंग, गाणे आणि बरेच काही. आपल्या आवडिच्या जोडीदाराची निवड करणे फारच अवडघ काम असते. तर आम्ही तुम्हाला ज्योतिषी मिलान करून सांगू शकतो की कोणते नाते दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात आणि कोणते नाही.    
 
1 तूळ आणि सिंह - तूळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव एकसारखा असतो. हे दोघेही सामाजिक असतात आणि लोकांना भेटणे, खुलून हसणे बोलणे यांचा आवडता छंद असतो. यांना स्वत:ला मांडायला आवडते.  
 
2 मेष आणि कुंभ - या दोन राशींचे लोक जास्तकरून एक दुसर्‍याचे जोडीदार बनले तर हे उत्तम निर्णय घेऊ शकतात. हे दोघेही प्रेम आणि रोमांचने भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात. हे दोघे ही सृजनात्मक असतात आणि स्वंच्छंदता पसंद पसंत करतात. हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात.  
 
3 मेष आणि कर्क - मेष राशि वाले नेहमी बहादुर आणि निडर असतात आणि कर्क राशिचे लोक ऊर्जावान असतात. हे जोडीदाराला देखील ऊर्जावान बनवून ठेवतात. या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते.  
 
4 मेष आणि मीन - मेष आणि मीन राशिचे लोक देखील आपसांत एक प्रेमळ संबंध बनवतात आणि एक मेकसोबत प्रखर संबंध बनवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ असतात. मीन राशिचे लोक एक्सलन्सची पातळी गाठतात तसेच मेष राशीचे लोक एक सर्वोत्तम नेतृत्व क्षमता असणारे असतात ज्यांचे संतुलन दोघांच्या संबंधांना बर्‍याच काळापर्यंत उत्तम ठेवू शकतात.  
 
5 वृषभ आणि कर्क - हे दोघेही एक मेकांना समान आदर आणि त्यांची प्रशंसा करतात, तसेच आपसी तालमेलचा उत्तम उदाहरण पेश करतात. जेथे कर्क राशिवाले खर्‍या मनाचे असतात तसेच वृषभ राशिचे लोक मदत करणारे असतात. दोघेही घर-परिवाराचे महत्त्व समझतात. उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवे.  
 
6 वृषभ आणि मकर - हे दोघेही एक मेकसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहतात. वृषभ राशि असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचे काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात, तसेच मकर राशीचे लोक यांची उदारता आणि समझदारीला पसंत करतात. 
 
7 मेष आणि धनू - धनु राशि वाले नेहमी आपल्या मनाचे ऐकतात आणि कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटकांपासून दूर राहतात. मस्ती आणि मजाक करणे यांना पसंत असत तसेच मेष राशि वालेपण सामाजिक रूपेण सक्रिय असतात आणि येथेपण ड्रामेसाठी जागा नसते.  
 
8 कर्क आणि मीन - ह्या दोन्ही जल तत्वाच्या रास आहेत जे यांच्या आत्मिक किंवा आध्यात्मिक संबंधांना दर्शवते. ह्या दोन्ही राश्यांचे लोक फार भावुक असतात आणि नेहमी या गोष्टींकडे आर्वजून लक्षात ठेवतात की एक मेकाला दुख नाही पोहोचले पाहिजे.  
 
9 सिंह आणि धनू - या दोन्ही राशीचे लोक पार्टीचे शौकीन असतात. सिंह राशि असणारे लोक स्वभावाने थोडे जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. या मुळेच हे दोघ प्रत्येक समस्येचे समादान काढण्यात यश मिळवतात.
 
10 कन्या आणि मकर - कन्या राशि लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुखी होतो. पण जेव्हा हे लोक कोणासमोर बोलतात तर त्यांच्याबरोबर ते मन मोकळेपणाने बोलतात. या वेळेस मकर राशिचे लोक यांच्याप्रती फारच सहजरित्या आकर्ष‍ित होऊन जातात.  
 
11 सिंह आणि मिथुन - जेथे सिंह राशीच्या लोकांना मानसिक रूपेण सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात तसेच मिथुन राशिचे लोक दुसर्‍यांना प्रेम जाणीव करून घेण्यास प्राथमिकता देतात.   
 
12 कुंभ आणि मिथुन - ह्या दोन्ही वायुतत्व असणार्‍या रास आहेत. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एक मेकांचा साथ देतात. मिथुन राशि वाले आयडियाची प्रशंसा करतात आणि कुंभ राशिचे जातक कलात्मक असतात. ही बाब दोघांमद्ये तालमेल बसवण्यात मदत करते.  
 
13 मिथुन आणि तूळ - ह्या दोन्ही रास ऐक मेकांवर पूर्ण अधिकार दाखवणारी असते आणि हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यात मदत करते. या दोघांमधील संबंध घाई गडबडीचा असेल पण तो नेहमी फ्रेश असेल. दोघेही आपसात शांतीचा मार्ग शोधूनच घेतात.
 
14 वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्‍याच बाबतीत एक सारखे असतात. दोघेही जोशीले किंवा आवेशपूर्ण स्वभावाचे असतात. आपसातील संबंधांमध्ये हे दोघेही समान व्यवहार करू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.    
 
15 वृश्चिक आणि कर्क - वृश्चिक आणि कर्क दोघेही जल तत्वाच्या रास आहेत, म्हणून ह्या दोन्ही राशीचे लोक एक मेकशी सहयोगात्मक पद्धतीने वागतात. या दोन्ही राशींचे लोक संवेदनशील असतात आणि एक मेकना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.  
 
16 वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या लोकांचे वृश्‍चिक राशीच्या लोकांशी संबंध सहयोगात्मक असतो आणि आपसातील समांजस्य चांगल असत. मीन राशी असणारे लोक फार सहयोगी स्वभावाचे असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.