वाईट नजरेपासून बचावासाठी लिंबू, उपाय जाणून घ्या
वाईट नजरेपासून बचावासाठी एक लिंबू डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा ओवाळावा. नंतर चार तुकडे कापून तीन रस्ते फुटत असतील अशा ठिकाणी फेकून द्यावे. मागे वळून न बघता परत यावे.
एक हिरवा लिंबू आणि 4 लवंगा घेऊन हनुमान मंदिरात जावे. शांत जागी लाल कापड पसरवून बसावे. आता लिंबात चारी लवंगा दाबून द्याव्या आणि 7 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करावा. नंतर लिंबू तिथेच सोडून घरी निघून जावं. याने सर्व अडचणी दूर होतात.
शनिवारी एक पिवळ्या लिंबाचे चार तुकडे करावे त्यात कुंकू भरावे. या लिंबाने दुकानाच्या चारी भीतींना स्पर्श करावे. नंतर या फाका चारी दिशांमध्ये फेकून द्यावा. याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि व्यवसायात लाभ मिळेल.
वाईट नजरेपासून बचाव म्हणून घर किंवा दुकानातील लिंबू-मिरची लटकवावी.
घरात सुख-शांतीसाठी लिंबाचं झाडं लावावं.