गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

हे 7 लक्षण असलेल्या स्त्रिया असतात भाग्यवान

lucky women
प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक लक्षण वेगवेगळे असतात आणि त्यांचे गुण देखील शारीरिक लक्षणांप्रमाणे वेगळे असतात. अनेक मुलांना वाटतं की त्यांची जीवन साथीदार भाग्यवान असावी. परंतू अशा मुली केवळ बघून शोधणं अवघड ठरतं. तरी आपण शारीरिक लक्षणावर लक्ष दिलं तर त्यांच्या व्यवहाराबद्दल जाणून घेणे सोपं होतं. म्हणून येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत असे शारीरिक लक्षण ज्याने याबद्दल माहिती पडू शकते.
 
मोठे डोळे
असं म्हणतात की ज्या मुलींचे डोळे मोठे-मोठे हरिणीसारखे असतात अशा मुली आणि महिलांचा स्वभाव अत्यंत चंचल असतो. अशा मुळी स्वत:जवळीक वातावरण आनंदी ठेवतात. 
 
लाल जीभ
तसेच ज्या महिलांच्या जिभेचा रंग लाल असून जीभ नाजुक असते त्यांना जीवनात सुख प्राप्ती होते. यांच्या भाग्यामुळे कुटुंबातील भाग्य देखील उजळतं.
 
नाकावर तीळ
नाकावर तीळ असणार्‍या मुली खूप भाग्यवान असतात. नाकावरील तीळ धन, संपन्न जीवनाचे संकेत असतं. 
 
सपाट तळपाय
या व्यतिरिक्त ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात.
 
उभारलेला अंगठा
उभार घेतलेला गोल आकाराचा अंगठा कुटुंबासाठी देखील भाग्य घेऊन येतं. अशा महिला नेहमी पतीसाठी समर्पित असतात. 
 
टाच
ज्या महिलांच्या पायाच्या टाचा गोल आकाराचा असून मऊ असतात त्या संपूर्ण आविष्य सुख-सुविधा भोगतात.
 
खोल बेंबी
ज्या स्त्रियांची बेंबी मोठी आणि खोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत. अशा स्त्रिया धन, सुख आणि संतान सुखाने संपन्न असतात.